दहिबांव-कोटकामते पुलासाठी 
सव्वा पाच कोटी निधी मंजूर

दहिबांव-कोटकामते पुलासाठी सव्वा पाच कोटी निधी मंजूर

Published on

९६१७५

दहिबांव-कोटकामते पुलासाठी तरतूद
सदाशिव ओगले ः अर्थसंकल्पात सव्वा पाच कोटी निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः तालुक्यातील अन्नपूर्णा नदीवरील दहिबांव कुपलवाडी ते कोटकामते जोडणार्‍या पुलाला नुकत्याच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलामुळे दहिबांव, नारिंग्रे ते कोटकामते आणि पर्यायाने लगतचे तालुके जोडणारे अंतर कमी होणार असल्याची माहिती माजी सभापती सदाशिव ओगले यांनी दिली.
या पुलाच्या अनुषंगाने श्री. ओगले बोलत होते. ते म्हणाले, "या पुलाची गेली कित्येक वर्षे मी सतत मागणी लावून धरली होती. तत्कालीन आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यकाळात या पुलाच्या कामासाठी १९९२ च्या सुमारास सुमारे पन्नास हजाराची प्राथमिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती; मात्र पुढील निधी उपलब्ध होऊ न शकल्याने काम होऊ शकले नव्हते. आता नुकत्याच जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काम होण्यासाठीच्या पूर्ण रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. या पुलामुळे कोटकामते ते दहिबांव आणि नारिंग्रे अंतर सुमारे ८ ते ९ किलोमीटरने कमी होईल. तसेच लगतच्या कणकवली आणि मालवण तालुक्यांतील गावे यामुळे जोडली जातील. पंचक्रोशीतील गावांना याचा लाभ होईल. या कामाच्या पूर्ततेसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला आता यश आले आहे. याकामी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी गांभीर्याने घेऊन या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता श्री. बासूदकर यांनीही विशेष मेहनत घेतली. आपण मागणी गेलेल्या पुलाला मंजुरी मिळाल्याने एक वेगळाच आनंद आहे. स्थानिक नागरिकांतही याबाबत समाधान असून, त्यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.