नव्या संधी शोधून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी

नव्या संधी शोधून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी

96183

नव्या संधी शोधून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी
दीपक केसरकरः सावंतवाडीत भंडारी समाजातील गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः भंडारी समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून हा समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी शोधून आपली प्रगती करणे महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर या स्टेजला समजले ते विद्यार्थी जीवनात निश्चितपणे यशस्वी होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा द्विवार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा भंडारी भवन सभागृहामध्ये पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री केसरकर बोलत होते. प्रतिवर्षी मंडळाच्यावतीने शिष्यवृत्तीधारक दहावी, बारावी तसेच पदवीधर व पदव्युत्तर परीक्षेतील विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विशेष नैपुण्य प्राप्त समाजातील व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यावर्षी प्रथमच हा कार्यक्रम भंडारी भवन सभागृहामध्ये घेण्यात आला. यावेळी प्रसाद अरविंदेकर, गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, हनुमंत पेडणेकर, शीतल नाईक, गुरुदास पेडणेकर, संजय पिळणकर, लऊ कुडव, शर्वरी पेडणेकर, निलेश गुरव, आनंद कोंडये, दिलीप पेडणेकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील मुलांना जर्मनीत नोकरी देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यासाठी या समाजातील होतकरू मुलांना ही संधी प्राप्त करून देण्यासाठी मी अग्रेसर राहील. भंडारी समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी शोधून आपली प्रगती करणे महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर या स्टेजला समजले ते विद्यार्थी जीवनात निश्चितपणे यशस्वी होतील. भंडारी समाजाने स्व-मालकीच्या जागेत सभागृह निर्माण करून हा कार्यक्रम घेतला याचे मला कौतुक आहे."
यावेळी संजय पिळणकर, देविदास आडकर तसेच दहावी तालुक्यात समाजातून प्रथम आलेला विद्यार्थी राज जीवबा वीर यांने आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर, प्रास्ताविक गुरुनाथ पेडणेकर तर आभार नामदेव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुरेश राऊत, बंड्या पराडकर, संतोष वैज, बाळू साळगावकर, अरविंद वराडकर, चंद्रकांत वाडकर, दीपक जोशी, समता सूर्याजी, उमा वराडकर, देवता पेडणेकर, दीपक सरमळकर, बाळू तळणीकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com