ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ९८ कुटुंबांचे नुकसान

ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ९८ कुटुंबांचे नुकसान

Published on

ओरोस-ख्रिश्चनवाडीतील ९८ कुटुंबांचे नुकसान
प्रशासनाकडून पंचनामे पूर्णः एकूण तीन कोटी ४१ लाखांची हानी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १०ः जिल्ह्यात रविवारी (ता. ७) मुसळधार पावसाने आलेल्या पुराचे पाणी ओरोस-ख्रिश्चनवाडीमध्ये घुसले होते. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यात एकूण ९८ कुटुंबांना नुकसान झाले आहे. अकरा घरे आणि तीन मांगर पूर्णतः कोसळले असून अन्य मालमत्तेचे अंशतः नुकसान झाले आहे. एकूण तीन कोटी ४१ लाख ५ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
ओरोस बुद्रुक गावाला रविवारी झालेल्या पावसामुळे मोठा फटाका बसला होता. पीटढवळ नदीचे पाणी उलटे आल्याने थेट वस्तीत घुसले होते. थेट मुंबई-गोवा महामार्गावरून हे पाणी बाहेर पडले होते. पाणी घरात घुसल्याने घराच्या भिंती, छप्पर कोसळले होते. यात घरातील धान्य, भांडी, दागदागिने यांसह अन्य घरातील साहित्य माती खाली गाडले गेले होते. याचे पंचनामे तात्काळ करण्यास सुरुवात केली होती. काल सायंकाळी ही प्रक्रिया संपली. तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व अन्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे पूर्ण केले आहेत. अंशतः नुकसान झालेल्यांची संख्या मोठी आहे. यात महादेव राणे ४७००, लुडदिन फर्नांडिस ४० हजार, आयरिस फर्नांडिस ११ हजार ५००, आग्नेल फर्नांडिस चार लाख, पात्रीस फर्नांडिस ७२ हजार ५००, मोहन मालवणकर दोन लाख १० हजार, प्रदीप चव्हाण २० हजार, अपर्णा रासम एक लाख ४ हजार, इतोरीन फर्नांडिस ६ लाख, अभिमन्यू मालवणकर चार लाख, फ्रान्सिस फर्नांडिस ६ लाख, महेश राणे ३४ हजार ६००, सायार फर्नांडिस एक लाख १५ हजार, पात्रीस फर्नांडिस ७९ हजार, चैताली परब एक लाख १८ हजार, मोहन मालवणकर एक लाख ५५, ग्रासिन फर्नांडिस ५ लाख ५ लाख ५९ हजार, प्रभाकर जाधव ९८ हजार, ग्रासीन फर्नांडिस दीड लाख, जेनिता फर्नांडिस ५० हजार, लियाव फर्नांडिस पाच लाख पाच हजार, नारायण तावडे साडे पाच लाख, विजय परब ६० हजार, अंकुश तुळसुलकर एक लाख २७ हजार, पावलू फर्नांडिस ९५ हजार.
अंकुश तुळसुलकर ११ हजार, मनीषा भोगले ८ लाख, सुप्रभा मालवणकर १ लाख ४५ हजार, पावलू फर्नांडिस २ लाख ८५ हजार, नारायण राणे २ लाख ६० हजार, अभिमन्यू मालवणकर ४ लाख ३ हजार, सुधीर मालवणकर १ लाख ५ हजार, रॉकी फर्नांडिस ७० हजार, मंगेश मालवणकर १ लाख ६५ हजार, रोमी फर्नांडिस १ लाख ७ हजार ५००, सविता मेस्त्री ३ लाख, स्वप्नील मठकर ३५ हजार, रोमी फर्नांडिस ८० हजार ६००, सुनील भोगले ५ लाख २० हजार, अंकुश भोगले ३ लाख ३० हजार, दिलीप साळगावकर ४० हजार, नितीन आईर १ लाख ४० हजार, विष्णू भोगले १ लाख ६० हजार, डॅनिस फर्नांडिस ४ लाख २० हजार, मिलिंद सावंत दीड लाख, आग्नेल फर्नांडिस ५ लाख, प्रकाश मठकर ८० हजार, मधुकर राठोड ४ लाख २५ हजार, गंगाराम साळगावकर ४६ हजार, कांचन राठोड चार लाख २५ हजार, सुवर्णा चव्हाण ५ लाख, सुजाता जाधव २ लाख ४५ हजार, शेरेपीन परेरा १५ लाख, आगोस्तीन लोबो १० लाख, मेरी लोबो ४ लाख (भाडोत्री), विजया कदम दीड लाख, बाळकृष्ण मालवणकर १० लाख ५ हजार, अब्दुल हमीद ८ लाख ८० हजार, नारायण परब दीड लाख, विष्णू मालवणकर अडिज लाख, ख्रिश्चनवाडी अंगणवाडी इमारत १७ लाख ६० हजार. नीरजा नाडकर्णी ५ लाख ४० हजार, प्रदीप चव्हाण २० हजार, महेश परब १ लाख ४० हजार, नीरजा नाडकर्णी ७ लाख, मैथिली परब १ लाख ४० हजार, विजय घाडीगावकर ५ हजार (भाडेकरू), अमित पोईपकर १५ लाख ८९ हजार (गाळेधारक भाडेकरू), सुरेश चव्हाण ५० हजार (गाळे धारक), सुभाष सावंत २ लाख ५० हजार (गाळे धारक), जयंत ठाकूर ३ लाख (गाळे धारक), गौतम श्रीरामनिवास १ लाख ९५ हजार (भाडेकरू), बास्तीन फर्नांडिस २ लाख, रमेश सावंत ९० हजार (कृषी पंप), गजानन परब १ लाख १० हजार, गीतांजली परब १ लाख, मायकल डिसोजा ३ लाख ६० हजार (कृषी पंप), ग्रामपंचायत ओरोस बुद्रुक अडिज लाख, दिलीप भोगले साडे आठ लाख, दत्तप्रसाद पार्सेकर ३ लाख ३० हजार, सदानंद कुडाळकर २ लाख ९० हजार, प्रसाद नाडकर्णी ५ लाख १० हजार, रुक्मिणी तावडे ८० हजार रुपये अशाप्रकारे नुकसान झाले आहे.
------------
चौकट
अकरा घरे कोसळली
पूर्णतः घरे कोसळलेल्यामध्ये कामिल फर्नांडिस आठ लाख १५ हजार, राधाबाई भोगले ९ लाख २० हजार, राजन भोगले ७ लाख, दिलीप भोगले ७ लाख दोन हजार, काशिराम भोगले ७ लाख ४८ हजार, प्रभावती भोगले ९ लाख ५० हजार, शरद परब ७ लाख ५० हजार, वेनेत फर्नांडिस १० लाख २० हजार, फ्रान्सिस फर्नांडिस ९ लाख ६० हजार, सुरेश भोगले ९ लाख ८० हजार, रोमी फर्नांडिस ३ लाख ९५ हजार अशाप्रकारे अकरा जणांचे पूर्ण घर कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. तर तीन मांगरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. यात सदानंद कुडाळकर दोन लाख ६० हजार, आमरोज फर्नांडिस एक लाख २० हजार रुपये, राधाबाई भोगले एक लाख १० हजार रुपये अशाप्रकारे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.