ःतायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये रत्नागिरीच्या खेळाडूंना ४२ पदके

ःतायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये रत्नागिरीच्या खेळाडूंना ४२ पदके

-rat१०p२०.jpg-
२४M९६१५६
ओळी ः रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेतील यशस्वी खेळाडू.
-----

तायक्वांदोमध्ये रत्नागिरीचे वर्चस्व

रत्नागिरीत चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन ; खेळाडूंना ४२ पदके

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२४-२५ आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी २२ सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कास्यपदकांची कमाई केली.
राजापूर येथे २२ वी सीनिअर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर सातवी कॅडेट व पीवी मुले व मुली तायक्वांदो स्पर्धा झाली. स्पर्धेत ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये रत्नागिरीमधील ६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पदक विजेत्या खेळाडूंची नावे अशी ः सुवर्णपदक- अथर्व मुरकुटे, पार्थ गुरव, स्वरा साखळकर, वेदांत चव्हाण, सार्थक चव्हाण, मृण्मयी वांयगणकर, ओम अपराज, देवण सुपल, अमेय सावंत, वेदागी हलबे, स्वर्णिका रसाळ, गौरी विलणकर, मृदुला पाटील, श्रेयसी हातिसकर, सुरभी पाटील, बरखा संदे, त्रिशा मयेकर, सर्मथा बने, प्रसन्ना गावडे. रौप्यपदक- रोहित कुंदकर, अनफाल नाईक, तुषार कोळेकर, अराध्य सावंत, सुजल सोळुंके, रावी वारांग, प्रांजल लांजेकर, अध्या कवीतके, श्रुती चव्हाण, सान्वी मयेकर, दिव्या साळवी, सई सावंत. कास्यपदक- आदित्य मोरे, मयुरेश गवळी, साकेत परकर, पार्थ गावडे, आर्वी नार्वेकर, सलोनी सुर्वे, गार्गी घडशी, ऋतुजा चित्ते. या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरूख शेख, मिलिंद भागवत, प्रशांत मकवाना, महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com