ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

Published on

ज्येष्ठ नागरिकांसाठी
वयोश्री योजना

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार साहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करता येतील. त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदींसाठी एकरकमी तीन हजार रुपये प्रतिव्यक्ती बँकेच्या खात्यात थेट वितरण प्रणालीद्वारे लाभार्थीना लाभ मंजूर करण्यात येणार आहे.
-------

दर्शना चव्हाण विशेष
कार्यकारी अधिकारीपदी

पाली ः तालुक्यातील जयगड बागवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां दर्शना चव्हाण यांची नुकतीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे. भाजप तालुका उपाध्यक्ष देवदास चव्हाण यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे परिसरातील नागरिकांची साक्षांकनाची सोय होणार आहे.
------

सामंत प्रशालेमध्ये
‘ग्रीन डे’ साजरा

पाली ः रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मीडीयम स्कूल प्रशालेमध्ये ग्रीन डे साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने प्रशालेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्यावतीने विविध उपयोगी वनस्पती, फुलझाडे, औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून सर्व प्रशालेमध्ये निसर्गाची अपूर्वाई-चैतन्याचा हिरवा रंग अशी थीम राबवण्यात आली होती. याच ग्रीन अनुषंगाने विद्यार्थी दुपारच्या जेवणाच्या डब्यातून हिरव्या पालेभाज्या घेऊन आले होते. या दिवसाचे औचित्य साधून ग्रीन थीमवर आधारित वर्गसजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या कल्पना संबंधित विद्यार्थी आणि शिक्षकांनी वापरून वर्ग सजावट केली होती. स्पर्धेमध्ये केजी विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी केलेली वर्ग सजावट ही अत्यंत सुरेख होती. प्राणीसंग्रहालय, निसर्ग आणि प्राणी यांचा समतोल राखणे गरजेचे आहे या विषयावर वर्ग सजावट केली होती तसेच केजीमधील मुलांनी सादर केलेला नृत्याविष्कार सुंदर होता. स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राथमिक विभागाला आणि तृतीय क्रमांक माध्यमिक विभागाला मिळाला.
------------

पोलिस उपनिरीक्षकपदी
पिलणकरांची निवड

रत्नागिरी : शहरातील पोलिस कर्मचारी संजय पिलणकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने शांतादुर्गा पिलणकर प्रासादिक उत्कर्ष मंडळातर्फे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. १९९१च्या भरतीमध्ये संजय पिलणकर पोलिस खात्यात भरती झाले. प्रथम सेवा रत्नागिरी पोलिस मुख्यालयात केली. त्यानंतर वाहतूक पोलिस मदत केंद्र हातखंबा, संगमेश्वर, जाकादेवी येथे त्यांनी काम केले. जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात आरोपींना अटक करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शहरात एक शिस्तबद्ध पोलिस शिपाई म्हणून त्यांचा कायम धाक वाहतूक शाखेत असल्यापासून आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांची उपनिरीक्षकपदी निवड केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.