उड्डापणपुलाच्या बांधकामात सुरक्षेसाठी उपाययोजना करा

उड्डापणपुलाच्या बांधकामात सुरक्षेसाठी उपाययोजना करा
Published on

बांधकामात सुरक्षेसाठी उपाययोजना करा

प्रशांत यादव ; उड्डापणपुलाच्या कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातून बहादूरशेखनाका ते पागनाकापर्यंत सर्वात मोठा पूल बांधण्यात येत आहे; परंतु या पुलाच्या कामाच्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कमालीचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दोनवेळा मोठे आणि गंभीर अपघात झाले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये या पुलाचे काम करत असताना तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले होते. या अगोदर पुलाचे दोन गर्डर कोसळून मोठा अपघात झाला होता. कामगारांना साधे हेल्मेट अथवा सेफ्टी शूज, इतर सुरक्षिततेची साधने पुरवण्यात आली नव्हती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पुलाच्या एकूणच कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या अपघाताची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव म्हणाले, आम्ही कोणत्याही विकासकामांमध्ये अडथळा आणू इच्छित नाही; परंतु मानवी मूल्य आणि मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. आमच्यादृष्टीने या गोष्टीला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने व औद्योगिक मानांकनाच्या नियमानुसार उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आल्या आहेत. यापुढे अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. शहरात महामार्गानजीक असलेल्या नागरी वस्तीत पावसाचे पाणी जाते. महामार्गावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन झालेले नाही. चौपदरीकरणानंतर महामार्गालगतच्या अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. या कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रशांत यादव यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.