वेतोशी येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

वेतोशी येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

-rat१०p३४.jpg-
२४M९६२२६
वेतोशी : वेतोशी येथे प्रगतशील शेतकरी अशोक साळुंखे यांचा सत्कार सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामार्फत करताना डॉ. सुरेश नाईक. सोबत शास्त्रज्ञ
----------

वेतोशीत अशोक साळुंखे यांचा सत्कार

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगांव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामार्फत वेतोशी येथील शिवार अॅग्रो टुरिझम येथे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रातिनाधिक स्वरूपामध्ये मत्स्य शेतकऱ्यांचा सत्कार केला.
प्रगतशील मत्स्य शेतकरी अशोक साळुंखे यांनी शिवार अॅग्रो टुरिझम हा प्रकल्प एकात्मिक शेती आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित करत आहेत. त्यांनी येथे आंबा, काजू झाड लागवड, भात, नाचणी शेती, गोपालन, कुक्कुटपालन असे विविध शेतीचे जोडधंदे वर्षभर ऋतुचक्रानुसार करतात तसेच शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन आणि गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धन असे प्रकल्प यशस्वी राबवले आहेत. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञांनी वेतोशी येथे प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर अशोक साळुंखे यांचा सत्कार सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि प्रमुख डॉ. सुरेश नाईक यांनी केला. या वेळी संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, मुकुंद देऊरकर आणि मजूर योगेश पिलणकर हे उपस्थित होते.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com