कोकण रेल्वे विस्कळीत

कोकण रेल्वे विस्कळीत

Published on

96255
मळगावः सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ताटकळत उभे असलेले प्रवाशी.


कोकण रेल्वेसेवा विस्कळीत
प्रवाशांचे हालः मालपे येथील बोगद्यात पाणी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १०ः कोकण रेल्वे मार्गावर कारवार विभागातील मडुरेपासून जवळच असलेल्या पेडणे-मालपे (गोवा) बोगद्यात पाणी आणि रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात चिखल, माती साचल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांशी गाड्या रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग सोलापूर, पुणे असे बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, सायंकाळी पावणेसात वाजता या मार्गावरील रेल्वे पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथून सुटणारी तुतारी एक्सप्रेस नियमित वेळत सोडण्यात आली. आज रात्री दहा वाजण्यापूर्वी पेडणे बोगद्यातून वाहतुक सुरू होईल, असे कोकण रेल्वेचे जनसंर्पक अधिकारी सचिन देसाई यांनी ''सकाळ''शी बोतलाना सांगितले. कोकणातून मुंबईकडे जाणारी दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, वंदेभारत सुपरफास्ट या गाड्या आज रद्द झाल्याने खाजगी प्रवाशी गाड्यांना प्रवाशांनी गर्दी केली होती.
कोकण रेल्वे मार्गावर पेडणे मालपे बोगद्यामध्ये भूगर्भातून पाणी येऊ लागल्याने रेल्वे रुळावर चिखल आणि पाणी साठले होते. काल (ता.९) सायंकाळी पावणे चार वाजता हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यावेळी गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मुंबईकडे जाणाऱ्या गोवा राज्यात सर्व रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या. युध्दपातळीवर काम झाल्यावर रेल्वे मार्ग मोकळा झाला. त्यानंतर रात्री थांबलेल्या सर्व रेल्वे गाड्या मुंबई आणि मडगावच्या दिशेने गेल्या. मात्र, पुन्हा मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बोगद्यात चिखल आणि पाणी साचले. त्यामुळे पुन्हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. या दरम्यान काही गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या.
कोकण रेल्वे मार्गावरील आज काही गाड्या रद्द केल्या. यात गाडी क्रमांक १२४४९ मडगाव ते चंदीगड, १२६२० मंगळूर सेंटर ते एलटीटी, १२१३४ मंगळूर ते सीएसटी एक्सप्रेस आणि ५०१०७ सावंतवाडी ते मडगाव यांचा समावेश आहे. गाडी क्रमांक २२२२९ वंदे भारत एक्सप्रेस, १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेस, १०१०३ सीएसटीएम मडगाव मांडवी एक्सप्रेस आणि १२१३३ सीएसटीएम ते मंगळूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच काही गाड्या शॉर्ट टर्मिनल करण्यात आल्या. यामध्ये २०१११ मुंबई सीएसटी मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही आज सावंतवाडीपर्यंत सोडण्यात आली. तसेच १२६१९ एलटीटी ते मेंगलोर ही गाडी सावंतवाडी स्टेशनपर्यंत सोडण्यात आली होती. गाडी क्रमांक १९५७७ तिरुणवेली जामनगर ही गाडी खुमटा मार्गे सोलापूर जंक्शन ते पुणे पनवेल अशी वळविण्यात आली. १६३३६ नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी सोलापूर मार्गे पुणे पनवेल, १२२८३ एर्णाकुलम निजामुद्दीन ही गाडी सोलापूर पुणे पनवेलमार्गे वळविण्यात आली. १६३४० तिरुअनंतपुम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी सोलापूर पुणे लोणावळा पनवेल अशी वळविण्यात आली होती.

चौकट
खाजगी वाहतुक तेजीत
रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक तेजीत आली. रेल्वेला पर्याय म्हणून कणकवलीसह कुडाळ, सावंतवाडी येथे आलेल्या रेल्वेच्या प्रवाशांनी खाजगी बसला पसंती दिली. सायंकाळी जिल्ह्यातील विविध शहरातून जादा खाजगी गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, एसटी महामंडळाकडून कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता.
---------
चौकट
प्रवाशांना तिकीटाचा परतावा
अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्याने आणि काहींचे मार्ग बदलल्याने प्रवाशांना तिकीटाचा परताव देण्यात आला. बहुतांशी प्रवाशांच्या ऑनलाईन तिकीट होत्या. त्यामुळे रेल्वेच्या खिडकीवर परतावा घेण्यासाठी प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. रेल्वे स्थांनकामध्ये गाड्या रद्द झाल्याबाबत वारंवार घोषणा केली जात होती. त्यामुळे फलाट सुनेसुने होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.