पोलीस पाटीलपदाच्या तात्काळ नियुक्त्या द्या

पोलीस पाटीलपदाच्या तात्काळ नियुक्त्या द्या

Published on

96256

पोलीस पाटीलपदाच्या
तात्काळ नियुक्त्या द्या
मिलिंद मेस्त्री : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली, ता. १० : कणकवली तालुक्यातील निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पोलीस पाटील पदी नियुक्ती द्यावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे पोलीस पाटील नियुक्ती रखडली होती. आता शैक्षणिक व अन्य कामांसाठी पोलीस पाटील दाखल्याची गरज भासते. तसेच प्रशासकीय कामेही करताना अडचणी येतात. कणकवली तालुक्यात पोलीस पाटीलपद भरती राबविण्यात आली असून निवड यादी जाहीर करून नियुक्ती बाकी आहे. कुडाळ प्रांताधिकाऱ्यांनी मागाहून पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून याआधी पोलीस पाटील नियुक्त्या केल्या आहेत. सध्या कुठलीही निवडणूक नसून आचारसंहिता ही नाही. मात्र याबाबत कणकवली प्रांत कार्यालयाकडून अद्याप कार्यवाही केलेली नाही. तरी पोलीस पाटील नियुक्‍तीची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी मेस्त्री यांनी केली.
प्रांताधिकारी कातकर यांना निवेदन देताना भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी, कळसुली सरपंच सचिन पारधिये, सुभाष मालंडकर, नयन दळवी, अभय गावकर, प्रज्ञेश राणे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.