पान एक-सिंधुदुर्गची लोकसंख्या दरवाढ निगेटिव्ह

पान एक-सिंधुदुर्गची लोकसंख्या दरवाढ निगेटिव्ह

96180 - डॉ. सई धुरी

जिल्ह्याची लोकसंख्या दरवाढ उणे
जन्म प्रमाण ७.७३ टक्के; सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता.१० ः सिंधुदुर्ग सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असून, लोकसंख्या वाढीचा दर उणे (निगेटिव्ह) आहे. जिल्ह्याचे निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ एवढे आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक सर्व उपाययोजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक लोकसंख्या दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. धुरी म्हणाल्या, ‘‘शासनाकडून लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. छोटे कुटुंब संकल्पनेचा प्रचार व प्रसार, कुटुंब नियोजन साधनांची सहज उपलब्धता, कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, विवाहाच्या योग्य वयाबाबत जनजागृती, किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला असता समाधानकारक स्थिती आहे. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. लोकसंख्येची घनता कमी आहे. जिल्ह्याचे एक हजार लोकसंख्येतील निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ टक्के एवढे असून, निवळ मृत्यू प्रमाण १२.५ तर अर्भक मृत्यू प्रमाण ९.३७ एवढे आहे.’’

जिल्ह्यातील जन्म प्रमाण नियंत्रणात
वर्ष*प्रमाण
२०११*११.१,
२०१२*१०.६८,
२०१३*१०.०२,
२०१४*९.९९,
२०१५*९.०८, २०१६*९.०५,
२०१७*९.०२,
२०१८*८.९५,
२०१९*८.७७, २०२०*७.४४,
२०२१*७.०४,
२०२२*७.८८
२०२३*७.७३

चौकट
‘कुटुंब नियोजन’ने
४०, ८२६ जोडपी संरक्षित
एप्रिल २०२४ मधील कुटुंब सर्व्हेनुसार जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातील एकूण जननक्षम जोडपी ८९ हजार ४५५ एवढी असून, त्यापैकी ४० हजार ८२६ जोडपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेने संरक्षित झालेली आहेत. १४ हजार १३६ जोडपी तांबी, निरोध किंवा गर्भनिरोधक गोळ्याने संरक्षित आहेत. उर्वरित ३४ हजार ४९३ जोडपी असरक्षित असून, या जोडप्यांना संरक्षित करणे हे आरोग्य विभागासमोरील उद्दिष्ट आहे, अशी माहिती डॉ. धुरी यांनी दिली.
-----------
कोट
लोकसंख्या दिनानिमित्त २७ जून ते १० जुलै या कालावधीत दांपत्य संपर्क पंधरवडा राबविण्यात आला. यावेळी कुटुंब नियोजन पद्धतीची व साधनांची माहिती देण्यात आली. लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये संतती प्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात येत आहे.
- डॉ. सई धुरी, आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com