परशुरामच्या वितरणात 67 विद्यार्थ्यांचा गौरव

परशुरामच्या वितरणात 67 विद्यार्थ्यांचा गौरव

Published on

rat११p१०.jpg -
२४M९६३२३
चिपळूण - यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

गुणवंत ६७ विद्यार्थ्यांचा गौरव

परशुराम सोसायटीचा पारितोषक वितरण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ६७ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सीए अमित ओक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित चव्हाण यांनी केले. शालांत परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

पाचवीपासून दहावीपर्यंत शिकत असलेल्या व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. सीए ओक यांनी शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता विविध उपक्रमांवर चांगल्याप्रकारे भर दिला जातो. या शाळेमध्ये शिकत असताना चांगले शिक्षक लाभले, याचा सार्थ अभिमान वाटतो. आजही तसेच शिक्षक असल्याचे ओक यांनी या प्रसंगी सांगितले. परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अभय चितळे यांनी परशुराम एज्युकेशन सोसायटी नेहमीच अशा प्रकारच्या उपक्रमांकरिता कटिबद्ध राहील, असेही त्यांनी आश्वासन दिले. मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन आपणही यशस्वी व्हा, असे मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका वैशाली निमकर, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक संदीप मुंढेकर, राजेश धापसी, पालक प्रतिनिधी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व आजी विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.