ज्ञातीबांधवांच्या प्रगतीसाठी सहकार्य करा

ज्ञातीबांधवांच्या प्रगतीसाठी सहकार्य करा

Published on

96336

ज्ञातीबांधवांच्या प्रगतीसाठी सहकार्य करा
रणजित देसाई ः कुडाळदेशकर प्रतिष्ठानतर्फे कुडाळात गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानच्या उन्नतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी समाजाला भूषणावह आहे. स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आव्हाने स्वीकारा, असे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई यांनी केली.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील कुडाळदेशकर ज्ञातीतील दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उत्साहात झाला.  यावेळी व्यासपीठावर डॉ. अनंत सामंत, श्रीमठ संस्थान दाभोली महामंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ प्रभुखानोलकर, सामाजिक कार्यकर्ते अमित सामंत, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, वेतोरे हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण सेवा समाज समिती कणकवलीचे अध्यक्ष सुरेश सामंत, प्रतिष्ठानचे सहसचिव डॉ. सुधाकर ठाकूर, कुडाळ हायस्कूल सेवानिवृत्त शिक्षिका सुलभा देसाई, देवगडच्या नगरसेविका हर्षा ठाकूर, डॉ. प्रशांत सामंत, अॅड. दिलीप ठाकूर, पत्रकार महेश सरनाईक, महेश परुळेकर, माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत सामंत, प्रभाकर देसाई, मोतिराम प्रभू, अभय वालावलकर, प्रसाद नाईक, रोहन देसाई, अॅड. विशाल देसाई, प्रदीप प्रभू, अविनाश वालावलकर, सूरज प्रभू, संग्राम खानोलकर उपस्थित होते.
डॉ. सामंत यांनी यश मिळविल्यानंतर त्यांचा आनंद भोगावयाचा असेल तर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणे गरजेचे असून, त्यासाठी अध्यात्माकडे वळा, असे आवाहन केले. अमित सामंत यांनी प्रतिष्ठानचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. स्वाती वालावलकर यांनी मुलांच्या आवडीनुसारच करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन पालकांना केले.
यावेळी विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या ज्ञातीबांधवांचा प्रतिष्ठानतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यात सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल डॉ. सुधाकर ठाकूर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल मेंबरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजन नाईक, मालवण येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदोन्नतीबद्दल प्रफुल्ल वालावलकर, कोकण रेल्वे प्रशासनाकडून सन्मानित केलेले तिकिट तपासनीस श्रीकृष्ण सामंत, अस्तित्व फाउंडेशनमार्फत (सोलापूर) रंगसाधक पुरस्काराने सन्मानित केलेले केदार सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल मेंबरपदी बिनविरोध निवडबद्दल मनोज वालावलकर, रंगगंध दिव्यांग कलाकारांच्या प्रायोगिक नाटकाचे लेखन केल्याबद्दल डॉ. प्रणव प्रभू यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अमित तेंडोलकर यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. आभार लक्ष्मण देसाई यांनी मानले.
.............
चौकट
विद्यार्थी गौरवासह लोगोचे अनावरण
सामंत हिच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारी अर्पिता सामंत (परुळे) हिच्यासह अन्य दहावी तसेच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व रक्तचंदनाचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेची अधिकृत नोंदणी केल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता. या प्रतिष्ठानचा विशिष्ट लोगो बनविला आहे. त्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.