हत्तींचा लपंडाव सुरुच

हत्तींचा लपंडाव सुरुच

96340

हत्तींचा लपंडाव सुरुच
कोलझर परिसरात वावरः ‘वन’च्या गस्तीला मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ११ः परिसरात गेला दिड आठवडा ठाण मांडलेल्या हत्तींच्या कळपाचा लपंडाव सुरुच आहे. मध्येच येऊन मोठे नुकसान करुन हा कळप जंगलात गायब होत आहे. पावसामुळे दाट जंगलात गस्त घालायच्या वनविभागाच्या मर्यादा आहेत. आजही हत्तींची हुलकावणी कायम होती.
केर-मोर्ले भागातून चार हत्तींचा कळप गेल्या आठवड्यात कोलझर परिसरात दाखल झाला. त्यांनी तळ्याची माटी, रायचे वायंगण या जंगलाच्या परिसरात असतलेल्या ठिकाणी मुक्काम ठोकला. तेथे नारळ, सुपारीचे नुकसान केल्याने हा प्रकार समोर आला. यानंतर वनविभागाने गस्त सुरु केली. मात्र, मधल्या काळात हे हत्ती जंगलातील भागातच स्थिरावले होते. त्यामुळे त्यांच्या नेमक्या अस्तित्वाचा अंदाज लागत नव्हता.
तळकट येथे मंगळवारी (ता.) रात्री या कळपाने बागायतीचे मोठे नुकसान केले. सुपारी, केळी उध्दवस्त केल्या. यात प्रामुख्याने भरत देसाई यांच्या बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. राजेंद्र देसाई यांच्या बागेतही हा कळप घुसला. वनविभागाने काल (ता.१०) रात्री या भागात गस्त वाढवली. मात्र, काल हत्तींचा गावठण भागात वावर नव्हता. पाऊस जास्त असल्याने जंगलात जाऊन हत्तींना मागे परतवणे जोखमीचे आहे. त्यामुळे वनच्या प्रयत्नांनाही मर्यादा येत आहेत.

चौकट
ऐन पावसात हत्तींचा वावर
यावेळी हत्ती पावसाळ्यात या बागायती भागात स्थिरावले आहेत. सहसा या हंगामात हत्तींचा कळप परतीच्या मार्गाला असतो. मात्र, याच कालावधीत त्यांचे आगमन झाल्याने भितीचे सावट आहे. या कळपात एका पिल्लाचा समावेश आहे. त्यामुळे हत्ती या भागात स्थिरावल्याचा अंदाज स्थानिक वर्तवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com