संदेश, संतोष यांचा सत्कार

संदेश, संतोष यांचा सत्कार

Published on

- rat११p१८.jpg -
P२४M९६३४६
दापोली ः मुख्याध्यापक महामंडळावर कोषाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संदेश राऊत, जिल्हा माध्यमिक अध्यापक सहाय्यक पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले संतोष हजारे यांचे अभिनंदन करताना.

लोकशाही आघाडीतर्फे
संदेश, संतोष यांचा सत्कार

हर्णै ः राज्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या नवीन राज्य कार्यकारणीवर मुख्याध्यापक संदेश राऊत यांची कोषाध्यक्षपदी तर जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले संतोष हजारे यांचा लोकशाही आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. दापोली तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबई यांच्या नवीन कार्यकारिणीवर सलग दुसऱ्‍यांदा निवड झाली. सोलापूर येथे ही बैठक होती. त्यामुळे मुख्याध्यापक राऊत यांचा सत्कार लोकशाही आघाडीकडून करण्यात आला तसेच जिल्हा माध्यमिक शाळासेवक पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले सारंग पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष हजारे यांचा लोकशाही आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक किशोर नागरगोजे व बिपिन मोहिते, माजी संचालक गिरीश पाटील, मुख्याध्यापक आयुब मुल्ला, आकाराम महिंद, संभाजी कोंडिकिरे आदी उपस्थित होते.

--------
‘वराडकर-बेलोसे’त
आरोग्य शिबिर

हर्णै ः आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या वराडकर कला आणि बेलोसे वाणिज्य वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय येथे ॲड. उदय तथा बाळासाहेब बेलोसे यांच्या ९व्या स्मृतिदिनी कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय दापोली व वराडकर-बेलोसे महाविद्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील दंत शल्यचिकित्सक डॉ. मिताली राठोड, समुपदेशक गीता पावरा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रणाली खेडेकर, तंत्र साहाय्यक उमेश पवार उपस्थित होते. या वेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यामध्ये रक्तगट तपासणी, दंतचिकित्सा तपासणी व आरोग्यविषयक विविध समस्यांवर उपस्थित डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ महाविद्यालय एनएसएस प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. जयश्री गव्हाणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मगदूम, कनिष्ठ महाविद्यालय प्रकल्पाधिकारी बिभीषण ढवळे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल तेजस रेवाळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
----------
- rat११p११.jpg
२४M९६३२८
- राजापूर ः शाळेला देणगी देताना शिवछत्रपती मित्र मंडळ कोळंब वरचीवाडीचे पदाधिकारी.

कोळंब वरचीवाडी शाळेला
५ हजार रुपयांची देणगी

राजापूर ः तालुक्यातील शिवछत्रपती मित्रमंडळ कोळंब वरचीवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेला रोख ५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते सुरेंद्र पाटेकर, नारायण पाटेकर, विनायक पाटेकर आदींनी ही देणगीची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक जयेश तेलंग यांच्याकडे सुपुर्द केली. या वेळी शिक्षक प्रसाद काकिर्डे, संतोष साळवी, विजयकुमार माने, प्रणाली मोरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. या देणगीसाठी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पाटेकर, उपाध्यक्ष संतोष राठोड, सचिव वैभव पाटेकर, खजिनदार रवींद्र कदम, सदस्य अंकुश पाटेकर, विजय पाटेकर, विलास पाटेकर, प्रकाश पाटेकर, हरिश्चंद्र पाटेकर, संतोष पाटेकर आदींचे योगदान राहिले असून, प्रशालेसह ग्रामस्थांकडून या मंडळाला धन्यवाद देण्यात येत आहेत.
-------
मिठगवाणेत वृक्षारोपण

राजापूर ः पंचक्रोशी जेष्ठ नागरिक संस्था, मिठगवाणे यांच्यावतीने बुधवारी (ता.१७) आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. चिरेखाण मिठगवाणे येथे होणाऱ्‍या या कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वनाधिकारी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विलास चेऊलकर, उपाध्यक्ष एकनाथ आडिवरेकर, सचिव रमेश राणे यांनी केले आहे.
...............
- rat११p१५.jpg-
२४M९६३३२
ः राजापूर ः साहित्य वाटप कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित आशिष दुर्गे आणि मित्रपरिवार.

दुर्गे परिवारातर्फे विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य भेट

राजापूर ः आशिष दुर्गे मित्रपरिवार मुंबई या संस्थेच्यावतीने तालुक्यातील कोंढेतड गाडगीळवाडी येथील अंगणवाडीतील १८ विद्यार्थ्यांसह अकरावी आणि बारावीतील शैक्षणिक साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासली. या वेळी आशिष दुर्गे मित्रपरिवाराचे प्रमुख आशिष दुर्गे, कोंढेतच्या सरपंच मनाली तुळसावडेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सेजल भामत, विमा प्रतिनिधी सुभाष नवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तुळसावडेकर, अभिजीत कदम, उदय खांडेकर, निनाद मासये, अतुल घवाळी, अमित जोगदीया, अंगणवाडी सेविका सारिका कोतरे, मदतनीस राखी कोतरे, बचतगट प्रमुख सुजाता वालेकर आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.