-गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

-गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला
Published on

- rat११p८.jpg -
P२४M९६२९८
देवरूख ः पोलिसांनी पकडलेला टेम्पो आणि संशयित.
----------
गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

देवरूख मार्लेश्वर मार्गावर कारवाई : मलकापुरातील दोघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ११ ः देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील निवेखुर्द येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो सतर्कतेमुळे पकडण्यात आला आहे. टेम्पो, दोन पाडे देवरूख पोलिसांनी जप्त केले असून, दोनजणांवर देवरूख पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरांची अवैध वाहतूक रोखणे हे पोलिसांसमोर एक आव्हान आहे.
रत्नागिरी येथील पशूहत्येची घटना ताजी असताना संगमेश्वर तालुक्यात गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. या घटनेची माहिती प्रमोद शिंदे (रा. देवरूख) यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली आहे. संतोष बंडू चव्हाण व श्रीराम बापू तळप (दोघेही रा. मलकापूर) अशी संशयितांची नावे आहेत. प्रमोद शिंदे हे भाडे घेऊन मंगळवारी सायंकाळी निव्याहून देवरूखच्या दिशेने येत होते. निवे येथे टेम्पोमध्ये दोन पाडे बांधलेले त्यांना दिसून आले. याची माहिती शिंदे यांनी रूपेश कदम यांना सांगितली. यानंतर नागरिक एकत्र आले.
हा प्रकार देवरूख पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरवली येथील हे पाडे घेऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर दिशेने जात असल्याचे पुढे आले. टेम्पोचालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना नव्हता. यामुळे उपस्थितांनी आक्रमक भूमिका घेतली. अवैध गुरे वाहतुकीचा प्रकार हा वेळीच थांबला पाहिजे, दोषींची कसून चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी दोन पाडे, टेम्पो जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत. गुरांची अवैध वाहतूक घटनेत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.