कबड्डी सराव शिबिराला प्रारंभ

कबड्डी सराव शिबिराला प्रारंभ

कबड्डी सराव शिबिराला
भरणेमध्ये प्रारंभ

खेड ः ७१वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुणे येथे १७ ते २० जुलैदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वरिष्ठ महिला संघाचे सराव शिबिर १० जुलैपासून सुरू झाले आहे. १६ जुलैला शिबिराची सांगता होणार आहे. खेड तालुका कबड्डी असोसिएशन खेड व काळकाई मंदिर विश्वस्त यांच्या संयुक्त विद्यमाने काळकाई मंदिर येथील प्रांगणात सुरू झालेल्या सराव शिबिराचे उद्घाटन १० जुलैला झाले.
------
प्रभात हायस्कूलमध्ये
वृक्षदिंडी उत्साहात

खेड ः तालुक्यातील शिवतर येथील प्रभात हायस्कूल येथे राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. या वेळी वृक्षदिंडी काढण्यात आली. शाळा समितीचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षपालखी खाद्यांवर घेत ढोलताशांच्या गजरात दिंडी काढली. संवर्धन करण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारिणी अधिकारी श्रीराम पालांडे, वनरक्षक अशोक ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिवतर गावदेवी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंतराव मोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक ऋषिकेश शिंदे, जयश्री फुंदे, मुख्याध्यापक आशफाक काझी, हरित सेना विभागप्रमुख लक्ष्मण बाईत आदी उपस्थित होते.
-----

आयुष्यमान कार्ड
आरोग्यवर्धिनीतर्फे वाटप

देवरूख ः देवरूखनजीक असणाऱ्या धामापूर प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत आरोग्यवर्धिनी वाशीतर्फे देवरूख येथे लायन्स हॉस्पिटल व उपकेंद्राच्यावतीने मोतिबिंदू आणि नेत्र तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायतीतर्फे आयुष्यमान कार्ड वाटप, आरोग्य तपासणी, कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. व्ही. आर. रायभोळे, डॉ. विजय पवार, डॉ. भक्ती वाजे, अशोक बोरसे, स्वाती गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरगोजे, प्रिंयाका इंगळे, सुमित यादव, मनीषा सावत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला सरपंच अनुष्का सावंत, उपसरपंच सुनील सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराचा लाभ १५० लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com