आरोग्य कर्मचारी संस्थेतर्फे गुणगौरव

आरोग्य कर्मचारी संस्थेतर्फे गुणगौरव

आरोग्य कर्मचारी
संस्थेतर्फे गुणगौरव
कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग ओरोसच्यावतीने २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात पूर्व माध्यमिक, माध्यमिक शिष्यवृती, दहावी, बारावी व पदवीधर परीक्षांमध्ये विशेष गुण मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौरव करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालक सभासदांनी संस्थेशी संपर्क साधून आपल्या पाल्याबाबतची माहिती (सभासद पालकाचे पूर्ण नाव व पाल्याच्या गुणपत्रकाची सत्यप्रत) २६ जुलैपर्यंत संस्था कार्यालयात पाठवावी, असे आवाहन संस्थाध्यक्ष लीलाधर सोमजी यांनी केले आहे.
............
विकास संस्थांची
आज वेंगुर्लेत बैठक
वेंगुर्लेः बँक व संस्था पातळीवर वसुलीस पात्र कर्जाची १०० टक्के पूर्णफेड करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन म्हणून संस्थांच्या व्यवस्थापक समितीचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उद्या (ता. १२) सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील विकास संस्थांसाठी खास सभेचे आयोजन केले आहे. सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या या सभेत विकास संस्थांच्या समित्यांना संबोधित करण्यात येणार आहे. शासन व जिल्हा बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. तसेच ३० जूनपर्यंत ज्या विकास संस्थांनी आपल्याकडील कर्जाची १०० टक्के वसुली केली आहे, अशा संस्थांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या सभेस तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष, सचिव, गटसचिव व संचालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले आहे.
............
जांभवडे हायस्कूलचे
शिष्यवृत्तीमध्ये यश
कुडाळः जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूलमधील मराठी माध्यमाचा आठवीचा विद्यार्थी साई सावंत याने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त केली. इंग्लिश मीडियमची पाचवीची विद्यार्थिनी संजना खरात हिने, तर आठवीतून चैताली चव्हाण व आराधना खरात यांनी शिष्यवृत्ती पटकावली. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे जांभवडे माध्यमिक शिक्षण समितीचे व्हाईस चेअरमन बा. शि. परब, सेक्रेटरी एकनाथ चव्हाण, सहसेक्रेटरी रामदास मडव, संस्था पदाधिकरी दिनकर आरवारी, लवू घाडी, आत्माराम गुरव, मनोहर गावकर, मुख्याध्यापक ए. वाय. कासले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
..........
शिष्यवृत्ती परीक्षेत
नेमळे शाळेचे यश
सावंतवाडीः शासनाकडून घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवत्ती परीक्षेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी भार्गवी आळवे हिने ६४.६६ टक्के गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली व जिल्ह्यात सातवा क्रमांक तर सावंतवाडी तालुक्यात प्रथम आली. याच विद्यालयातील विद्यार्थी हर्ष वारंग याने ५९.३३ टक्के घेऊन जिल्ह्यात २८ वा व सावंतवाडी तालुक्यात सहावा आला. या यशप्राप्त विद्यार्थ्यांचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, माजी प्राचार्य किरण वेटे यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा. कल्पना बोवलेकर, आर. के. राठोड उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना किरण वेटे, नितीन धामापूरकर, एल. आर. जाधव, आर. एस. राऊळ, डी. आर. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com