चिपळूण ःमहामार्गावरील समस्यांची अखेर प्रत्यक्ष पाहणी

चिपळूण ःमहामार्गावरील समस्यांची अखेर प्रत्यक्ष पाहणी

-ratchl११५.jpg
24M96448
चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करताना अधिकारी व पदाधिकारी.

महामार्गावरील समस्यांची अखेर पाहणी

बैठकीतील निर्णयानंतर कार्यवाही; उपाययोजनांना सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी साचणारे पाणी, कोलमडलेली गटारांची व्यवस्था, निवाराशेड अशा अनेक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी आवाज उठवल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. गुरुवारी (ता. ११) पोलिसांच्या उपस्थितीत अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी महामार्गाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली
गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यातून जाताना कसरत करावी लागल्याने वाहतूक मंदावली होती. पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याने या समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत होते. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत उभे राहावे लागते. अशा अनेक समस्यांबाबत मुकादम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात बैठक घेऊन अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. या समस्या तत्काळ मार्गी लागल्या नाहीत तर थेट रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. पोलिसांनीही अधिकारी व ठेकेदार कंपनीला योग्य त्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित समस्यांची पाहणी केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
त्यानुसार गुरूवारी उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता एस. एम. खुणेकर, महामार्गाचे प्रोजेक्ट मॅनेजर इसहाक खान, सेफ्टी इंजिनिअर शहाबुद्दिन रशिद, शौकत मुकादम, कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडिक, चंद्रकांत सावंत, बशीर चिकटे, अख्तर मुकादम, मनोहर खेराडे यांनी महामार्गावर ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. मुकादम यांनी प्रत्यक्ष जागेवरील समस्या निदर्शनास आणून दिल्या. संपूर्ण पाहणी करून त्याची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली. या समस्या निकाली काढण्यासाठी योग्य उपाययोजना तातडीने राबवल्या जातील, असे आश्वासन देत काही कामांना सुरवात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com