चिपळूण-परशुराम घाटातील वळणावर टॅंकर रूतला

चिपळूण-परशुराम घाटातील वळणावर टॅंकर रूतला

-ratchl116.jpg
96449
चिपळूण ः परशुराम घाटातील वळणावर चिखलात रूतलेला टॅंकर.

परशुराम घाटात टॅंकर रूतला

चिपळूण, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील अवघड वळणावर मालवाहू टँकरला अपघात झाला. या टॅंकरमधून अल्कोहोलसारखा पदार्थ नेण्यात येत होता. अपघातग्रस्त टॅंकर चिखलात रूतला असून, त्याला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाताना परशुराम घाटाच्या माथ्यावर असलेल्या अवघड वळणाच्या ठिकाणी हा अपघात झाला. सुमारे ४० हजार लिटर अल्कोहोल वाहून नेत असतानाच हा अपघात घडला. घाटातील चढणीवर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्ता सोडून बाहेर गेला. तो बाहेर काढत असताना चिखलात आणखी रूतला. टँकरची दोन्ही बाजूची चाके चिखलात फसल्याने क्रेन मागवण्यात आली. उशिरापर्यंत हे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच तातडीने तेथे अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. त्यानंतर महामार्ग पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com