रेल्‍वे साहित्‍य चोरी प्रकरणी कोडोली येथून एक ताब्‍यात

रेल्‍वे साहित्‍य चोरी प्रकरणी कोडोली येथून एक ताब्‍यात

Published on

रेल्‍वे साहित्‍य चोरी प्रकरणी
कोडोली येथून एक ताब्‍यात
कणकवली, ता. ११ : येथील रेल्‍वे स्थानकालगतच्या रेल्‍वे ट्रॅक्‍शन वर्कशॉपमधील साहित्‍य चोरी प्रकरणी कणकवली पोलिसांनी आज पन्हाळा कोडोली येथून एका संशयिताला ताब्‍यात घेतले. हंबीरराव सावळा गोसावी (वय ४०) असे त्‍याचे नाव आहे. या चोरी प्रकरणी अन्य चार ते पाच संशयित असून त्‍यांचा तपास सुरू असल्‍याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली.
कणकवली रेल्‍वे स्थानकालागत असलेल्‍या वर्कशॉपमधून ८९ किलोची कॉपर वायर, ५०४ किलोचे कॉपरचे तुकडे असे एकूण दीड लाख रूपये किंमतीचे सहित्‍य २२ जून रोजी चोरीला गेले होते. याबाबत रेल्‍वे अभियंत्‍यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. त्‍यानुसार पोलीस निरीक्षक अनिल हाडळ, हवालदार श्री.पांढरे, रेल्‍वे पोलीस निरीक्षक श्री.यादव यांनी तपास सुरू केला होता. यात कणकवली रेल्‍वे स्थानक तसेच कणकवली शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यावेळी एका वाहनात भरून हे साहित्‍य नेण्यात येत असल्‍याची बाब उघडकीस आली होती. त्‍यानुसार कणकवली पोलिसांनी आज पहाटे दोन वाजता कोडोली पन्हाळा येथे जाऊन हंबीरराव गोसावी याला वाहनासह ताब्‍यात घेतले. त्‍याला उद्या (ता. १२) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.