पान पाच मेन-''तेरेखोल''ने इशारा पातळी गाठली

पान पाच मेन-''तेरेखोल''ने इशारा पातळी गाठली
Published on

01571

‘तेरेखोल’ने इशारा पातळी गाठली
आळवाडी बाजारपेठेत पाणीः प्रशासनासह स्थानिक सतर्क
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठली. तेरेखोलच्या पुराचे पाणी शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरले. येथील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला होता. दरम्यान अतिउत्साही चालकाने पुराच्या पाण्यात मोटार घातल्याने मोटार अडकली. अखेर प्रसंगवधान राखत बांद्यातील युवकांनी मोटार व चालकाला सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आज सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले.
बांदा परिसरात काल (ता. ३१) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी आज सकाळीच तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठली. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. आज सकाळीच तेरेखोलच्या पुराचे पाणी शहरातील आळवाडी परिसरात शिरण्यास सुरुवात झाली. पुराच्या भीतीने नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रारंभ केला. सकाळीच आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे प्रशासनासह स्थानिकही सतर्क होते.
शहरात आळवाडी भागात पुराचे पाणी वेगाने वाढत होते. आळवाडी येथून शेर्ले येथे जाण्याच्या उद्देशाने एका अतिउत्साही मोटार चालकाने पुराच्या जाण्यासाठी मोटार पाण्यात घातली. मात्र, आळवाडी येथे पाण्याची पातळी अधिक असल्याने मोटार पाण्यात अडकली. मच्छिमार्केट इमारतीसमोर मोटार पाण्यात अडकल्याची माहिती स्थानिक युवकांना मिळाली. त्यांनी लागलीच पाण्यात उतरून मोटारीला तसेच आतील चालकाला सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुपारपर्यंत पाणी याठिकाणी स्थिर होते.
सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले. मात्र, तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत असल्याने व नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर असल्याने पुराची भीती अद्यापही आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पुराची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक सातत्याने पुरस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक काही काळ बंद होती. अनेक छोट्या पुलांवर ओहोळचे तसेच नदीचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, कुठेही पडझडीची व नुकसानीची नोंद झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com