यंदा बाप्पाला महागाईची झळ

यंदा बाप्पाला महागाईची झळ

Published on

rat२२p२.jpg-
OP२४N०६१२७
रत्नागिरी ः रत्नागिरीतील साईनगर -महालक्ष्मी वसाहत येथील मुर्तीकार चिन्मय पांचाळ यांच्या कैवल्य गणेश चित्रशाळेत तयार झालेल्या शाडू मातीच्या सुबक मुर्ती.

यंदा गणपती बाप्पाला महागाईची झळ

गणेशमुर्तीच्या किंमतीत ३० टक्क्यांची वाढ ; मुर्तीकाम अंतिम टप्प्यात, चित्रशांळामध्ये लगबग

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. २२ ः कोकणवासीयांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत. जसे सणाचे दिवस जवळ येत आहेत, तसे गणेश चित्रशाळांतून गणेशमुर्तीच्या कामाना वेग आला आहे. सध्या ग्रामीण व शहरी भागातील गणेशमुर्तीचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. यंदा गणेशमुर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे दर वाढल्यामुळे गणेशमुर्तींच्या किंमतीत ३० टक्यांनी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात बहुतांश गणेशमुर्ती शाडू मातीपासून तयार केल्या जातात. काही मुर्तीकार पर्याय म्हणून लाल मातीचा वापर करतात. काही ठिकाणी जिल्ह्याबाहेरुन प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मुर्ती आणल्या जात आहेत. कच्चा स्वरुपात पनवेल, कोल्हापूर येथून मुर्ती आणून विक्री केली जात आहे. हलक्या आणि रेखीवमुर्ती असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र यांचा परिणाम मात्र परंपरागत सुरु असलेल्या चित्रशाळांवर होत आहे. पण मनुष्यबळाची कमतरता कुशल कारागिर मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात नेहमीच प्लास्टरच्या मुर्तीची चढाओढ पहायला मिळते. शाडू माती कामाला वेळ लागत असल्याने आणि काम शेती आटोपल्यानंतरच सुरु होत असल्याने मुर्तीकारांनी ग्राहकांच्या मागणीनुसार प्लास्टरच्या मुर्ती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे वेळेची बचतही होत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व चित्रशांळामध्ये मुर्तीकारांची लगबग सुरु असून रंगकामाला सुरूवात झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून मुंबईतील मुर्तीचा प्रभाव येथील भाविकांवर पडल्याचे दिसत आहे. त्याच प्रमाणे मुर्ती घडविण्याची गळ घातली जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीची उंची अधिक असते काही मंडळे मुंबई, पनवेल येथून गणेशमुर्ती आणतात. सध्या रत्नागिरी शहरातही प्लास्टरच्या मुर्तींची दालने सजली आहेत. अनेक भाविक मुर्ती पसंत करुन आगाऊ रक्कम भरुन मुर्ती राखून ठेवत आहेत. गणेशमुर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, रंग, मजुरी वाहतूक खर्च वाढल्यामुळे गणेशमुर्तीच्या दरातही वाढ झाली आहे. यावर्षी २५ ते ३० टक्के मुर्तीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यातच यातील काही वस्तुंवर जीएसटी लागू करण्यात आल्याने गणेशभक्तांना दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
-------
१ हजार ते आठ हजारापर्यंतच्या मूर्ती

चित्रशाळांमध्ये मूर्तीच्या उंचीनुसार व साच्यातील मूर्तीचे दर वधारले आहेत. एक फूट उंचीची मूर्ती १ हजार ते दीड हजार रूपये, दीड फूट उंचीसाठी दीड हजार ते दोन हजार रूपये, दोन फुटासाठी अडीच हजार ते तीन हजार, चार फूट उंचीसाठी साडेचार हजार ते पाच हजार, पाच फूटाच्या उंचीसाठी साडेपाच ते सहा हजार रूपये, सहा फूट उंचीसाठी साडेसहा ते सात हजार, सात फूट साडेसात ते आठ हजार रुपये आहेत. मात्र मूर्ती लहान अथवा मोठी असली तरी गणपती मुर्तीकाराच्या हस्तकौशल्यातून तयार झाला असेल तर त्याची किंमत फुटाला अडीच हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com