अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट प्रदान

अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट प्रदान
Published on

- rat२८p१७.JPG-
P२४N०७५८१
लांजा ः चंद्रकांत करंबळे दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित करताना डॉ. अविनाश सकुंडे, श्रेयांश मेहता, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रमेश कुमार, सानीपिना जयलक्ष्मी राव आदी.

अमेरिकेच्या विद्यापीठाकडून
करंबळे यांना डॉक्टरेट प्रदान

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३० ः तालुक्यातील गव्हाणे येथील चंद्रकांत शिवराम करंबळे यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. ही पदवी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे आयोजित नेल्सन मंडेला फेलोशिप आणि ग्रेट इंडियन पार्लमेंट अॅवॉर्ड २०२४ कार्यक्रमात वितरित करण्यात आली.
चंद्रकांत करंबळे हे मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी असून, गुरूमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी डॉ. अविनाश सकुंडे, श्रेयांश मेहता (आय.एस.), उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रमेश कुमार, सामाजिक कार्यकर्ते सानीपिना जयलक्ष्मी राव, राजेश मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गुरूमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष करंबळे यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल लांजा तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
---------
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com