

पुरवणी डोकेः सौ. मनीषा वेंगुर्लेकर सेवानिवृत्ती विशेष
swt308.jpg
N08085
सौ. मनीषा वेंगुर्लेकर
swt309.jpg
N08086
पती नारायण वेंगुर्लेकर व मुलगा संकेत वेंगुर्लेकर यांच्यासह सौ. मनीषा वेंगुर्लेकर.
swt3010.jpg
08078
बांदाः येथील गोगटे वाळके महाविद्यालयात आदर्श बँक सेवेबद्दल सौ. मनीषा वेंगुर्लेकर यांचा सत्कार करताना मान्यवर.
सुसंस्कृत, सेवाभावी नेतृत्त्व
लीड
बांदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील विशेष सहाय्यक अधिकारी सौ. मनीषा नारायण वेंगुर्लेकर या शनिवारी (ता.३१) नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. गेली ३५ वर्षे त्यांनी या शाखेत आपल्या सुसंस्कृत व सेवाभावी स्वभावाने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. त्याच्या निवृत्तीच्यानिमित्ताने...
---------------------
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. बँक ऑफ महाराष्ट्रच्या बांदा शाखेत विशेष सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत असलेली माझी आई सौ. मनीषा नारायण वेंगुर्लेकर (पूर्वाश्रमीच्या सुनीता भीमसेन कनयाळकर) या शनिवारी (ता. ३१) नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. योगायोगाने आज (शनिवारी) तिचा वाढदिवस असल्याने तिला भावी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण, नकळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होते. पण, ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. ज्यांना तुम्ही गुरूस्थानी मानून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिलेल्या असतात; म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो. पण, या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. तुमच्या जवळपासची व्यक्ती सेवानिवृत्त होणार असेल तर तुमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना मांडण्याची ही योग्य वेळ आहे.
महाराष्ट्र बँकमध्ये कोणाचेही काम असेल तर ‘वेंगुर्लेकर मॅडमना भेटा. त्या सर्व निट समजावून सांगतील.’ अशी त्यांची बांदा पंचक्रोशीत ओळख आहे. आई गेली ३५ वर्षे ६ महिने आपल्या सुसंस्कृत व सेवाभावी स्वभावाने ग्राहकांना चांगली सेवा देत आली आहे. त्यांची सेवानिवृत्ती आमच्यासाठी आनंदादायी असली तरी बँकेत रोज येणाऱ्या ग्राहकांना आता ‘वेंगुर्लेकर मॅडम’ ही भावनाच मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी आतापर्यंत कामाविलेले हे ग्राहकांचे प्रेम आहे.
आजी-आजोबा दोघेही शिक्षकी पेशात असल्याने आईला शिक्षणाची प्रचंड आवड, तिने बीएससी, बीएड करून खेमराज हायस्कूल, विलवडे हायस्कूल, आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे नोकरी केली. शिक्षणाची आवड असल्याने तिने एमए पण केले आणि ७ फेब्रुवारी १९८९ ला बँक ऑफ महाराष्ट्र तरळे शाखेत रूजू झाली. श्री देव बांदेश्वरच्या कृपेने बांदा शाखेत बदली झाली. आणि बांदा शहरातील तसेच आजुबाजुच्या गावातील लोकांची तिला सेवा करायची संधी मिळाली. पेंशन धारकांना सेवा देताना मला त्यांच्यात माझे आई-बाबा दिसतात असे ती नेहमी म्हणायची. बाबा महसूल खात्यात असल्याने त्यांना रात्रंदिवस तसेच काही वेळा सुट्टीच्या दिवशी देखील कामावर जावे लागायचे. त्यांना देखील आईने आणि बाबांनी आईला नीट सांभाळून घेतले. बाबा मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे तहसीलदार म्हणून काम बघत असताना आईने नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या सांभाळल्या. तिच्या संस्कारामुळेच आज आम्ही समाजात ताठ मानेने उभे आहोत. बँक म्हणजे माझे दुसरे घरच आहे, असे आई मला नेहमीच सांगते. मला जेव्हा लोक सांगतात तुझी आई खूप चांगली माहिती देते आणि काम करते हे ऐकून खूप भारावल्यासारखे होते.
आज आई सेवानिवृत्त होत आहे. मात्र, घरच्या सेवेतून ती नेहमीच मार्गदर्शकच्या भूमिकेत राहील. मला नोकरीच्या मागे न लागण्याचा सल्ला देत व्यवसायासाठी तिने नेहमीच प्रोत्साहन दिले. तिच्या यशस्वी पाठिंब्यामुळेच मी आज माझ्या व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहे. तिच्या मार्गदर्शनानेच मला पुढील वाटचाल करायची असल्याने मी खुप आनंदित आहे. तिला पुढील यशस्वी आयुष्यासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच तिला उत्तम आरोग्य व निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी श्री बांदेश्वर भूमिका चरणी प्रार्थना करतो.
- संकेत नारायण वेंगुर्लेकर
पुरवणी संकलनः निलेश मोरजकर
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.