मंडणगड व्यसनाधिनतेचा विळख्यात सापडतोय

मंडणगड व्यसनाधिनतेचा विळख्यात सापडतोय

Published on

मंडणगड व्यसनाधिनतेचा विळख्यात?

अमली पदार्थांवर कारवाई; पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः खेड पोलिसांनी गेल्या आठवड्यातील गांजा तस्करीच्या कारवाईत तालुक्याचे संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बदलत्या काळात या तालुक्यात व्यसनाधिनतेचा विळखा पडतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंडणगडात गांजाची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे.
गेल्या दोन दशकात गाव ते लहान शहर असा प्रवास तालुक्यातील मंडणगड शहराने पूर्ण केला आहे. शहरीकरणामुळे विकासाबरोबरच गुन्हागारीचे लोणही येथील सामाजिक जीवनात रूजू लागल्याचे गुन्हेगारी प्रकारावरून पुढे येत आहे. गांजा या अमली पदार्थाची हाताळणी करणाऱ्यांची प्रकरणे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच होती. त्याचा व्यापार म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कारभार सुरू नव्हता. रात्रीच्या अंधारात चार भिंतीच्या आड किंवा निर्जन ठिकाणी या संदर्भात लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत; मात्र मद्यसेवनाप्रमाणे हे प्रकार पुढे आलेले नाहीत. त्याची पाळंमुळे किती खोलवर रूजली आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणांपुढे आहे.
-----
कोट १
अमली पदार्थ व तस्करीबाबत घडलेल्या घटना या मंडणगड तालुक्याबाहेरील आहेत. तरीही कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने यंत्रणा सतर्क असून, विविध स्तरावर या विषयी जागृती, माहिती देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयात जनजागृती सुरू आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, समस्या जाणून त्यावर उपाययोजनात्मक कार्यवाही चालू आहे. नागरिकांशी संवादातून पोलिस यंत्रणा सुरक्षेच्यादृष्टीने सतर्क आहे.

- नितीन गवारे, पोलिस निरीक्षक, मंडणगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com