

नवजात अर्भकाच्या मृत्यूमुळे
खासगी दवाखान्याची तोडफोड
सावंतवाडीतील प्रकार, प्रकरण पोलिसांत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० : नऊ महिन्यांच्या नवजात अर्भकाचा प्रसृती दरम्यान मृत्यू झाल्याच्या रागातून एका खासगी डॉक्टरच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार आज तालुक्यात घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही बाजूंनी तडजोडीची भूमिका घेतल्यामुळे या घटनेची नोंद करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
संबंधित गर्भवती महिला तालुक्यातील एका डॉक्टरकडे उपचार घेत होती; मात्र तीन दिवसांपूर्वी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉक्टरकडे तपासणीसाठी धाव घेतली. यावेळी डॉक्टरने सर्व काही ‘नॉर्मल’ असल्याचे सांगितले. रात्री तिला पुन्हा त्रास जाणवू लागला. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाचे ठोके मिळत नाहीत, परिस्थिती गंभीर आहे, असे सांगून संबंधित डॉक्टरांनी सिजर करण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यावेळी मृत बाळ जन्माला आले. संबंधित डॉक्टरने चुकीचा डोस दिल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला, असा नातेवाईकांचा आरोप आहे. याबाबतची माहिती आज गर्भवती महिलेच्या भावाला कळाल्यानंतर त्याने संबंधित डॉक्टरची भेट घेतली. त्यावेळी त्या डॉक्टरने त्याला उद्धट भाषेत उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त युवकाने दवाखान्याची तोडफोड केली. त्यानंतर संबंधित दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर उशिरा दोघांनी तडजोडीची भूमिका घेतली. दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांच्याशी चर्चा केली असता, गर्भवती महिलेला प्रसुती अवस्थेत ब्लडप्रेशरचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यावेळी हा प्रकार होऊ शकतो. ही एक नैसर्गिक स्थिती आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरला दोष देणे योग्य नाही. संबंधित डॉक्टरने त्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.