आंबडोस तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विष्णू परब

आंबडोस तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विष्णू परब
Published on

15884

आंबडोस तंटामुक्ती समिती
अध्यक्षपदी विष्णू परब
मालवण : आंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विष्णू परब यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. परब यांनी २००७ ते २०१२ या काळात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यावेळी तत्कालीन सरपंच दिलीप परब, ग्राम स्वच्छता समिती अध्यक्ष रमेश नाईक, तंटामुक्ती उपाध्यक्ष शशिकांत नाईक, तत्कालीन उपसरपंच दिगंबर नके यांच्या सोबतीने तंटामुक्ती गाव पुरस्कार प्राप्त केला. नुकत्याच झालेल्या आंबडोस ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये परब यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून प्रशांत नाईक, सचिवपदी नवनिर्वाचित पोलिसपाटील समीर परब यांना पदभार देण्यात आला. सल्लागार म्हणून वासुदेव वरवडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच सुबोधिनी परब, उपसरपंच रामदास नाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com