मद्य वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करा

मद्य वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करा
Published on

मद्य वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करा

एम. देवेंदर सिंह ः संशयास्पद व्यवहारावर करडी नजर ठेवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करावा तसेच सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. संशयास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूक २०२४ची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जस्मिन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण बिराजदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, एसएसटी पथक मोठे बनवा, भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:चे मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्त्वांचा सूचनांचा अभ्यास सर्वांनी करावा.
---------
सर्वसमावेशक पथक तैनात

पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, गोवा बनावटीच्या मद्य वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलिस विभागाला द्यावी जेणेकरून त्याच्या मुळाशी जाता येईल. आरोपींची सविस्तर माहिती काढता येईल. पोलिस, महसूल, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर असे सर्वसमावेशक पथक तपासणी नाक्यावर तैनात करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com