

- rat१७p१५.jpg-
२४N१९४८२
रत्नागिरी ः वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मुंबई उपकेंद्रातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला भेट
हेगशेट्ये महाविद्यालयाची
मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील ४० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला भेट दिली.
महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी केली. या वेळी नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख डॉ. सुकुमार शिंदे, प्रा. सुशील साळवी, प्रा. सचिन गिजबिले, ग्रंथालय प्रमुख मेघा पोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. उपकेंद्रात सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लाभ महाविद्यालयातील मुलांनी घ्यावा, हा यामागचा हेतू होता. या वेळी उपकेंद्रातील ग्रंथपाल बिपिन जाधव, प्रा. बोरगावे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेविषयी मार्गदर्शन केले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.