

19634
कणकवलीच्या चतु:सीमांच्या
भेटीसाठी देवतरंगांचे सिमोल्लंघन
कणकवली, ता. १७ : दसरोत्सव सोहळा पार पडल्यानंतर कणकवली शहरातील श्रीस्वयंभू रवळनाथ मंदिरातील देवतरंग चतु:सिमांच्या भेटीसाठी बाहेर पडले आहेत. या देवतरंगांचे आज बाजारपेठ येथे आल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन करण्यात आले.
दसऱ्यानंतर दरवर्षी कणकवलीच्या ग्रामदेवता तरंगांसह शहराच्या वेशीवर असलेल्या देवतांच्या भेटीसाठी बाहेर पडतात. आजपासून या चतु:सिमांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आज देवतरंग बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात निघाले त्यांचे पटकीदेवी मंदिर, झेंडा चौक येथील नांदरूकी देवस्थान तसेच ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन करण्यात आले. आज देवतरंगांनी कणकवली पोलीसासमोरील महापुरूष मंदिर, तेथून गडनदीकाठी असलेले गाडादेव मंदिर आणि माऊली देवस्थान येथे भेटी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.