बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र आवश्यक

बांदा शहरासाठी स्वतंत्र
वीज उपकेंद्र आवश्यक
Published on

20497

बांदा शहरासाठी स्वतंत्र
वीज उपकेंद्र आवश्यक

राजाराम सावंतांची महावितरणकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः शहरात औद्योगिक, वाणिज्य तसेच घरगुती वीज वापरात वाढ झाल्याने व सततच्या कमी दाबाच्या वीजपुरवठा समस्येतून सुटका होण्यासाठी बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची उभारणी करावी, अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
सावंत म्हणाले की, ‘‘बांदा शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. शहरात औद्योगिक तसेच वाणिज्य संकुले मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत. त्यामुळे साहजीकच विजेच्या मागणीतही वाढ होत आहे. शहराला इन्सुली उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. येथूनच सावंतवाडी तालुक्यातील बहुतांश गावांना वीजपुरवठा केला जातो. बांदा शहराची वीज मागणी वाढतीच असल्याने परिणामी कमी दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे शहरवासीयांना विविध वीज विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. आठवड्यात मंगळवार हा महावितरणचा देखभाल दुरुस्ती दिवस असल्याने दिवसभर शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे बांदा शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारावे. यासाठी तातडीने सर्व्हे करून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com