गोवळकोट परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरले
- rat३१p११.jpg-
२४N२२४१७
गोवळकोट रोड परिसरातील खड्डे भरताना नगर पालिकेचे कर्मचारी सोबत साजिद सरगुरोह.
गोवळकोट परिसरातील खड्डे भरले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः येथील पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील गोवळकोट व गोवळकोट रोड परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी याविषयी आवाज उठविला होता.
शहरातील गोवळकोट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सातत्याने ओरड होत होती. नागरिक व वाहनधारकांच्या तक्रारीची दखल घेत साजिद सरगुरोह आणि सहकारी कार्यकर्त्यांनी नगर पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे गोवळकोट व गोवळकोट रोड परिसरातील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची दखल घेतली. बांधकाम विभागामार्फत कर्मचाऱ्यांनी ज्या भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तेथील खड्डे डांबरखडीने भरण्यास सुरूवात केली आहे. याबद्दल साजिद सरगुरोह यांनी मुख्याधिकारी व प्रशासन आणि बांधकाम विभाग याचे आभार मानले. या वेळी सरगुरोह यांनी नागरिकांना होणारा त्रास व समस्या यापुढेही सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

