शहरात स्वागत, ग्रामीण भागात शेतीवर नजर
-rat३१p२६.jpg -
P२४N२२४४७
मंडणगड: दिवाळीच्या सणांत शेतात काम करताना शेतकरी.
-rat३१p२५.jpg -
P२४N२२४४६
घराचे अंगण बनविताना महिला.
-------------
शहरात स्वागत, ग्रामीणमध्ये शेतीवर नजर
मंडणगडमध्ये दिवाळी उत्साहात ; बाजारातील गर्दीने व्यापारी आनंदित
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ ः पहिल्या आंघोळीने दीपावलीला सुरवात झाली आहे. उत्साहाचा हा दिवाळी सण शहर आणि गाव या दोन वेगवेगळ्या स्तरावर परिस्थिती नुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरात सणाचा उत्साह तर गावातून कामांचा उत्साह दिसून आला. भाऊबीज होऊपर्यंत विविध कार्यक्रमांची शहरी भागात रेलचेल असल्याने मिठाई, फटाके, कपडे यांची बाजारात मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये विशेष उत्साह आहे.
दीपावलीचे पहिल्या दिवशी भल्या पहाटे अभ्यंगस्नान करुन प्रथम फटाके फोडून, गावातील देवळात नवीन कपडे घालून देवदर्शन करायचे. देवळात भजनाचा आनंद घ्यायचा व शेवटी दिवाळीच्या फराळाचा मनमुराद आनंद लुटायचा हा सर्व समाज घटकांचा नित्यक्रम यात बदलत्या काळात अनेक बदल दिसून येत आहेत. जुन्या पिढीतील सगळे आपला दरवर्षीचा नित्यक्रम पार पाडताना आले. यंदा वाढलेली महागाई, महिना अखेरमुळे कोलमडलेले बजेट यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना रोजच्या कामाची घडी विस्कटू नये यासाठी महिलांना कसरत करावी लागत होती.
ग्रामीण भागातील बहुतांश कष्टकरी समाज हा दीपावली साजरी करण्याचे शहरी संस्कृतीपासून आजही दूर आहे. गावागावातील लोक आजही शेतात कापणी, मळणी, अडगवणीत व्यस्त आहेत. घराचे अंगण बनविणे, त्याला सारवण करणे अशी कामे करण्यावर लक्ष केंद्रित केले. बच्चे कंपनी मात्र किल्ले बनवून सुटीचा सद्पयोग करीत असून मुंबई, पुण्यातून चाकरमानी गावी दाखल झाल्याने गावांचे प्रांगण पुन्हा गजबजली आहेत.
----------
कोट
परतीचा पाऊस वाढल्याने सुगीच्या दिवसांत दिवाळीचा सण आला आहे. शेतात तयार पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो आहे. धान्य घरी आणणे हीच शेतकऱ्यांची दिवाळी असून दिवाळी शेताच्या बांधावर साजरी करावी लागत आहे. कष्टाचा घाम हीच दिवाळीची आंघोळ आहे.
- संतोष पोस्टुरे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

