पत्नीचा खून करणारा झारखंडमधून ताब्यात
पत्नीचा खून करणारा झारखंडमधून ताब्यात
कुडाळ पोलिसांची कारवाईः पोलीस कोठडीत रवानगी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ः चारित्र्याच्या संशयावरून पत्नी रेणुका ऊर्फ रेश्मा ओमप्रकाश सिंह (वय ४२ वर्षे, रा. नेरुर कविलगांव), हिचा खून करून पसार झालेल्या ओमप्रकाश बंधन सिंह (वय ५२, सध्या रा. भडगाव, बुद्रुक, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, मुळ झारखंड) याला कुडाळ पोलिसांनी विमानाने झारखंड गाठत नक्षलग्रस्त भागातून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून तो पसार झाला होता. काल (ता.३०) रात्री ११ वाजता कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
पोलीस निरिक्षक मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यात भडगाव बुद्रुक येथे सेंट्रीगच्या कामासाठी राहात असलेल्या ओमप्रकाश बंधन सिंह याने पत्नी रेणुका हिला १३ ऑक्टोबरला भडगाव येथे बोलावून घेत चारित्र्याचे संशयावरुन गळा आवळून खून करुन पसार झाला होता. याबाबत मुलगी रिया ओमप्रकाश सिंह (वय १९, रा. नेरुर कविलगांव) हिने दिलेल्या तक्रारीवरुन संशयितावर येथील पोलीसात गुन्हा दाखल केला होता.
तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे या गुन्हयाचा तपास करीत होते. संशयिताच्या मुळ गावी तसेच नातेवाईकांकडून त्याच्याबाबत कोणतीही माहीती उपलब्ध होत नव्हती. त्याच्या मोबाईलचे लोकेशनवरून पथक मुंबईमध्येही गेले होते. मात्र, त्याने मोबाईल बदलल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेऊन त्याच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरवरून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तपासात तो झारखंड राज्यात हिंदगिरी भागात वास्तव्यास असल्याचे समजले.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांचे पथक विमानाने झारखंड येथे पोहचले. त्यांनी दोन दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला. तो संपूर्ण परिसर नक्षल प्रभावित परिसर असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगून तिथे स्थानिक पथकाच्या मदतीने परीसरावर लक्ष ठेवून शिताफीने ओमप्रकाश याला ताब्यात घेतले.
चौकट
कारवाईतील शिलेदार
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपअधीक्षक विनोंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांनी बजावली. आरोपीच्या लोकेशनबाबत तपासी पथकास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कहऱ्हाडकर, पोलीस उपनिरीक्षक शेगडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हडाळ, पोलीस हवालदार प्रितम कदम तसेच सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

