

शिक्षणातील बदलेली
प्रणाली आत्मसात करा
बुलंद पटेल ःआयडियल स्कूलमध्ये डिजिटल बोर्ड प्रशिक्षण
कणकवली,ता. २४ ः बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणातील प्रणाली बदलत आहे. मुलांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होत आहे. बदलणारी शिक्षणातील ही नवी प्रणाली आत्मसात करायला हवी, असे प्रतिपादन वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष बुलंद पटेल यांनी केले.
वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये भगीरथ प्रतिष्ठानतर्फे डिजिटल बोर्ड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रशालेचे सल्लागार डी.पी तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, माड्याची वाडी नेरुरचे मुख्याध्यापक अनंत सामंत, श्री. अत्तार, श्री.मालवणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलंद पटेल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात भगीरथ प्रतिष्ठानची प्रशालेला डिजिटल बोर्ड देण्याची संकल्पना काय आहे. याबाबत अनंत सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले ‘‘संस्थाध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांची भगीरथ प्रतिष्ठान ही संस्था असे उपक्रम जिल्हाभरात राबवत आहे. अनेक शाळांमध्ये याचे मार्गदर्शन दिले जाते.’’ यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. अत्तार यांनी शिक्षकांना डिजिटल बोर्डवर विविध शिक्षण सामुग्री तयार करण्याची आणि सादर करण्याची महत्त्वपूर्ण कौशल्य शिकवले. डिजिटल बोर्डचा वापर विद्यार्थ्यांचा लक्ष वेधून घेणारी शिकवणी आणि संवादात्मक पद्धती साकारण्यात मदत करतो. त्यांना अधिक सृजनशील बनवू शकतो, असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी दाभोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सोन्सूरकर, करुळ हायस्कूलचे श्री. जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष मोहन सावंत, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा.नीलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. सौ.बांदल यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.