

रखवालदारीसाठी गुरखे संगमेश्वरात
संगमेश्वरात थंडी वाढली ; पोलिस ठाण्यात नोंद करणे आवश्यक
संगमेश्वर, ता. २४ ः गेल्या चार दिवसांत संगमेश्वर परिसरामध्ये थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. हे वातावरण आंबा-काजू पिकांना पोषक आहे. त्यामुळे कलमांना मोहोर येण्याची प्रक्रिया काही दिवसांत सुरू होईल. त्यामुळे आंबा-काजू बागेच्या सुरक्षेसाठी संगमेश्वर तालुक्यात गुरखे दाखल होऊ लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत बागांच्या रखवालदारीसाठी गुरख्यांना नेमले जाते. त्यामुळे ऑक्टोबर महिना सुरू झाला की गुरखे रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागतात. यंदा आंबा हंगाम उशिरा असल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रियाही लांबली आहे. आता कुठेतरी मोहोर येण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे गुरखेही येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र परिसरामध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी या गुरख्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. परप्रांतातून येणाऱ्या या लोकांची माहिती तातडीने पोलिस ठाण्यात नोंदविली पाहिजे. स्थानिक मजुरांची संख्या कमी असल्यामुळे या लोकांना व्यवसाय करणे कठीण बनते. अशावेळी परप्रांतातून येणाऱ्या लोकांना आंबा बागांच्या राखणीसाठी आणले जाते. त्यात नेपाळवरून अनेक गुरखे उदरनिर्वाहासाठी आणि येथील लोकांना त्यांची गरज असल्याने बोलावले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.