राजापुरातील दोन मतदान केंद्रावरील मशिनबाबत तक्रार

राजापुरातील दोन मतदान केंद्रावरील मशिनबाबत तक्रार
Published on

राजापुरातील ‘त्या’ मशिनची पडताळणी करा

आमदार साळवी ः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत संशय व्यक्त केला जात आहे. राजापूर मतदार संघातील दोन मतदान केंद्रातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनची पडताळणी करण्याची मागणी माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्‍यांकडे केल्याची माहिती आमदार साळवी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला. या निकालावर संशय निर्माण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्‍यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदवला असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २ चाफवली व मतदान केंद्र २०० तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर व व्हीव्हीपॅटची पडताळणी करून निर्माण झालेला संशय दूर करावा, असे निवेदन दिल्याची माहिती माजी आमदार साळवी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com