मुंबई-सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

मुंबई-सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट
Published on

-rat29p32.jpg
28390
अलिगड ः खो-खो स्पर्धेतील विजेता महाराष्ट्राचा मुलांचा संघ.

rat29p33.jpg
28391
दुसऱ्या छायाचित्रात विजेता मुलींचा संघ.

लोगो- ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा

सलग दहाव्यांदा महाराष्ट्र दुहेरी विजेता

मुलांचे सलग १९ वे, मुलींचे १० वे विजेतेपद; ओडिशा संघाचा पराभव

रत्नागिरी, ता. २९ ः कुमार व मुलींच्या ४३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट पटकावला. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ क्रीडांगणावर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कुमार गटाचे हे १९ वे तर मुलींचे १० वे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण ३५ वे तर मुलींचे २६ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे.
शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटांत ओडिसा संघाला नमवत ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण), प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करत लढत देण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी चार खेळाडू टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान (२.०० मि. ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. ६ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची १८-१४ ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), कृष्णा बनसोडे (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करत विजयात जोरदार साथ दिली. ओडिसाकडून बापी मुरमू (२.००, १.२० मि. संरक्षण व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मि. संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली.
मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी पूर्णपणे पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केले.
------
चौकट
सुहानी धोत्रे ''जानकी'', जितेंद्र वसावे ''वीर ''अभिमन्यू''चे मानकरी
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र वसावे, हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा), संरक्षक : बापी मुरमू (ओडिसा), तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र).
-----
चौकट
महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल
यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो. त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी १ व मुलींनी ४ गुण वसूल केले. ओडिसाच्या मुलांनीही एक गुण कमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com