जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत लढणार

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत लढणार
Published on

53799

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत लढणार
वैभव नाईकः कुडाळ मतदारसंघात वाढदिवस विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः गेल्या दहा वर्षांत या भागातील सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. आज आमदार नसलो तरी येथील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहीन. ठाकरे शिवसेना पक्षाशी मी कालही निष्ठावंत राहिलो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे आणि ती तुम्ही निश्चितच द्याल, याचा विश्वास आहे. हजारो शिष्ठावंत शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच पुढे असेन, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात केले.
कुडाळ ठाकरे शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा बुधवारी (ता. २६) सायंकाळी येथील सिद्धिविनायक सभागृहात पार पडला. यावेळी महिलांनी वैभव नाईक यांचे औक्षण केले. त्यानंतर नाईक यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, बाळ कनयाळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जयभारत पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, श्रेया परब, बबन बोभाटे, कृष्णा धुरी, सुशील चिंदरकर, अतुल बंगे, संतोष शिरसाट, योगेश धुरी, स्नेहा दळवी, अर्चना बंगे, अनुजा सावंत, मेघा सुकी, संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होता.
श्री. उपरकर यांनी, वैभव नाईक हे जनतेच्या मनातले आमदार आहेत. त्यांचा वाढदिवस २०२९ मध्ये आमदार म्हणून साजरा करण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला लागा. त्यांना पुन्हा आमदार बनविण्याची शपथ घेऊन सर्वांनी कामाला लागूया, असे सांगत नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
श्री. सामंत यांनी, वैभव नाईक यांच्याबद्दल लोकांच्या मनातील स्थान आजही आमदार म्हणूनच आहे. सर्वसामान्य जनतेला वैभव नाईक मनापासून आमदारच वाटतात, हेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे यश आहे, असे गौरवोद्गार काढत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. समीर चराटकर यांनी बहारदार निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com