संगमेश्वर येथील अवैध धंदे बंद

संगमेश्वर येथील अवैध धंदे बंद
Published on

संगमेश्वर येथील
अवैध धंदे बंद
संगमेश्वर ः संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद केल्याने संगमेश्वर पोलिस ठाण्याचे नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी पारवे यांच्यावर ग्रामस्थांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेली अनेक वर्षे गावठी हातभट्टीची दारू, क्लब, जुगार, गांजा विक्री, मटका आदी अनेक प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. नुकताच या पोलिस ठाण्याचा कार्यभार पारवे यांनी स्वीकारला आणि सर्व अवैध धंदे बंद करून या धंदेवाल्यावर आपला वचक बसवला आहे. विशेषतः तालुक्यातील हातभट्टी व्यावसायिकांवर कारवाई करून ते सर्व धंदे बंद केले आहेत.
---
-rat२७p१३.jpg-
२५N५३७९१
रमाकांत पवार

शिक्षणविस्तार
अधिकारीपदी पवार
चिपळूण ः तालुक्यातील रावळगाव शाळा रावळगाव नं. १चे मुख्याध्यापक रमाकांत पवार यांची शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून बीट चिपळूण नं. २ येथे पदोन्नती झाली आहे. त्यांच्या शिक्षकीसेवेस दापोली तालुक्यातून सुरवात झाली. ते रावळगाव शाळा क्र. १ मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. एक सेवाभावी, उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित असून, सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. राष्ट्रभाषा हिंदी संघटनेचे ते सचिव होते. ज्ञानदीप वाचनालयाचे ते सचिव आहेत. आपण आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केले असून, सेवाकाळात असलेल्या प्रत्येक शाळेच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही जबाबदारी ओळखून मी माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असे पवार यांनी सांगितले.
---
आमदार निधीतून
शाळांना साहित्य
खेड ः कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून खेड, चिपळूण, गुहागर, दापोली व मंडणगड या तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांना डिजिटल साहित्य (संगणक प्रोजेक्टर, ई -लर्निंग) वाटप करण्यात आहे. हा कार्यक्रम लोटे येथील हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. हायस्कूलचे मुख्याध्यापक यशवंत लोंखडे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाला गुहागर, दापोली, मंडणगड, चिपळूण, खेड येथील शाळांचे प्रतिनिधी हजर होते तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय बुटाला, राजू रेडीज, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com