कळसुलकर प्रशाळेत आज ''देणे नक्षत्रांचे''

कळसुलकर प्रशाळेत आज ''देणे नक्षत्रांचे''

Published on

कळसुलकर प्रशाळेत
आज ‘देणे नक्षत्रांचे’
सावंतवाडीः शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित कवी ग्रेस यांच्या जीवनकार्यावर आधारित ''देणे नक्षत्रांचे'' हा सांस्कृतिक कार्यक्रम उद्या (ता. २९) सायंकाळी ५ वाजता कळसुलकर हायस्कूल येथे विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
................
वेताळबांबर्डेत रविवारी
‘दुरितांचे तिमीर जावो’
कुडाळः वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा या प्रशालेच्या विनाअनुदानित वर्गांच्या मदतीसाठी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त रविवारी (ता. ३०) सायंकाळी ७.३० वाजता श्री देव रवळनाथ पंचायतन प्रासादिक नाट्यमंडळ श्रींची इच्छा कलामंच तेंडोली प्रस्तुत ''संगीत दुरितांचे तिमीर जावो'' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. प्रशालेच्या गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी येथे आयोजित या नाट्यप्रयोगाचा दानशूर व्यक्तींनी व नाट्यप्रेमींनी लाभ घेऊन प्रशाळेला मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने चेअरमन रघुनाथ गावडे यांनी केले आहे. या विद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यायी वर्गखोल्या महत्त्वाच्या आहेत. हाच दृष्टीकोन ठेवून प्रशालेच्या विनाअनुदानित वर्गाच्या मदतीसाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.
....................
मालवणात आज
शंभुराजेंना वंदन
मालवणः छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी-बलिदान दिनानिमित्त कुंभारमाठ येथील राष्ट्रभक्त हिंदूंतर्फे उद्या (ता. २९) सायंकाळी ६.४५ वाजता तेथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी अॅड. समीर गवाणकर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. सामूहिक पुण्यस्मरण करून पणत्या लावण्यात येतील. ऐतिहासिक चित्रपट ''शिव छत्रपतींचा छावा'' दाखविण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..................
अणावला सोमवारी
धार्मिक कार्यक्रम
कुडाळः अणाव-पालववाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे सोमवारी (ता. ३१) स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता स्वामींचा अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भजने होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठातर्फे करण्यात आले आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com