संगमेश्वर - कोकणी शिल्पकाराची जहांगीरमध्ये पंचधातूतील शिल्पे

संगमेश्वर - कोकणी शिल्पकाराची जहांगीरमध्ये पंचधातूतील शिल्पे
Published on

कोकणी शिल्पकाराचे जहांगीरमध्ये प्रदर्शन
किरण शिगवण यांचा पंचधातूतील कलाविष्कार; चंबळ नदीतही उभारला पुतळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ः कलाविश्वातील अवलिया कलाकार म्हणून ओळखले जाणारे चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथील शिल्पकार किरण शिगवण यांच्या पंचधातूतील शिल्पांचे प्रदर्शन जहांगीर आर्टगॅलरीत प्रदर्शन भरले असून, ते ३१ मार्चपर्यंत रसिकांसाठी निःशुल्क खुले आहे. शिल्पकार शिगवण हे सध्या नालासोपारा येथे राहात असले तरी ते मूळचे कोकणचे आहेत.
आत्मिक समाधानासाठी भारतीय संस्कृती, पोत हा विषय घेऊन अनेक पंचधातूतील शिल्पे घडवली आहेत. याच शिल्पाचे प्रदर्शन जहांगीर आर्टगॅलरी २५ मार्च रोजी सुरू झाले असून, ३१ मार्चपर्यंत कलारसिकांना पाहता येणार आहे. गावच्या लाल शाडू मातीपासून सुरवात ते दगड, लाकूड, पंचधातू, मार्बलमध्ये मोठमोठे पुतळे, मंदिरावरील मूर्ती, महापुरुषांची शिल्पे घडवणारा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कलेची दखल घेत बॉम्बे आर्ट सोसायटी, स्टेट आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अशा देशपातळीवरील कलेच्या क्षेत्रातील नामवंत संस्थांनी त्यांच्या कलेचा अनेक पुरस्काराने गौरव केला आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच शिल्पकलेचा छंद त्यांनी जोपासला. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला (स्कल्पचर अँड मॉडलिंग) जी. डी. आर्ट हा चार वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. मुंबईत आल्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेला चालना मिळाली. मोठमोठ्या नामवंत कंपन्या, अनेक शहरातील चौकात उभे असलेले महापुरुषांचे पुतळे, राजस्थान-कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीत दिमाखात उभे असलेल्या स्मारके ही त्यांच्या कलेची साक्ष आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा महापुरुषांचे पूर्ण आकृती, अर्धाकृती पुतळे/शिल्प, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील शिल्पकलेचे कामही त्यांच्या हातून घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com