

54067
आंगणेवाडीच्या तेजस्वीला
‘सिव्हिल’मध्ये मास्टर्स डिग्री
इंग्लडमध्ये शिक्षण पूर्ण केल्याने कौतुक
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : आंगणेवाडीची सुकन्या तेजस्वी चव्हाण हिने सिव्हिल इंजिनअरिंगचे मास्टर्स डिग्रीचे शिक्षण इंग्लंड येथे नुकतेच पूर्ण केले. कु. तेजस्वी ही माध्यमिक विद्यालय बिळवसची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी तिचा प्रशालेत सत्कार केला. ज्येष्ठ ग्रामस्थ सीताराम आंगणेही तिचा सत्कार केला.
तेजस्वीने पहिली ते पाचवीचे शिक्षण आंगणेवाडी प्राथमिक शाळा, ५ वी ते ७ वी बिळवस हायस्कूलमधून तर ९ वी आणि १० वी टोपीवाला हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर डिप्लोमा सिव्हिल इंजीनियरिंग हे पॉलिटेक्निक मालवण आणि सिव्हिल इंजिनीयरिंग डिग्री भारती विद्यापीठ पुणे मधून प्राप्त केली आहे. खडतर अशी मास्टर्स डिग्री युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग इंग्लंडमधून प्राप्त केली आहे. संस्थाध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी अभिनंदन करताना तेजस्वीचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी देशाबाहेर जाऊन शिक्षण घेताना तुमच्या शिक्षणाचे माध्यम कधीच अडचण होत नाही. आपण शिकण्याची इच्छा ठेवली की आपण यशस्वी होतो, असे प्रतिपादन तेजस्वीनीने केले. यावेळी उद्योजक बाबुराव चव्हाण, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, संस्थेचे सरचिटणीस अशोक पालव, सल्लागार प्रभाकर पालव, सदस्य राजेंद्र पालव, सुरेश पालव व मधुकर आंगणे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.