मोबाईल टॉवर कार्यान्वित न केल्यास आंदोलन अटळ

मोबाईल टॉवर कार्यान्वित न केल्यास आंदोलन अटळ
Published on

54114

‘मोबाईल टॉवर कार्यान्वित
न केल्यास आंदोलन अटळ’

अणसूर-भदगावडेवाडीतून इशारा

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः अणसूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात भदगावडेवाडी याठिकाणी बीएसएनएलचा टॉवर कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी अणसूर ग्रामपंचायतमार्फत सावंतवाडी येथील जिल्हा प्रबंधक यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
अणसूर-भदगावडेवाडी येथे बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आलेला असून, तो मागील एक वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे. अद्यापपर्यंत तो कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आस्थापित केलेली नाही. हा टॉवर ज्या जागी बांधलेला आहे, त्याच्या आसपास अन्य कुठल्याही कंपनीची ध्वनी लहरी उपलब्ध नाही, असे निवदेनात नमूद केले असून, येत्या पंधरा दिवसांत तो कार्यान्वित न केल्यास सावंतवाडी कार्यालयासमोर उपोषणला बसणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य संयमी गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, वामन गावडे, भाजप कार्यकर्ते प्रभाकर गावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com