

54429
सहायक पत्तन अभियंता
लक्ष्मण परुळेकर आज निवृत्त
ओरोस, ता. ३० ः सिंधुदुर्ग पत्तन विभागाकडे सहायक पत्तन अभियंता वर्ग १ या पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण हिरोजी परुळेकर हे उद्या (ता. ३१) ३८ वर्षे, १० महिने एवढ्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर निवृत्त होत आहेत.
एक मनमिळाऊ आणि कामाशी प्रामाणिक राहून विकासकामे होण्यास प्राधान्य देणारे अधिकारी अशी त्यांची जिल्हा प्रशासनात ओळख होती. ते ६ जून १९८६ ला जिल्हा परिषद बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले होते. सुरवातीची पाच वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेकडे बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता व त्यानंतर शाखा अभियंता म्हणून काम केले. जिल्हा परिषदेकडे इमारती बांधकामे करणे, देखभाल-दुरुस्ती, रस्ते तयार करणे, रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती, साकव बांधणे आणि त्यांची दुरुस्ती, पायवाटा बांधणे अशी कामे केली. राज्य शासनाकडून त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सिंधुदुर्ग पत्तन विभागाकडे सहायक पत्तन अभियंता वर्ग १ म्हणून देवगड उपविभागाकडे पदोन्नती झाली. या काळात त्यांनी पत्तन विभागाकडे समुद्रकाठाचे धूपप्रतिबंधक बंधारे बांधणे, जेटी बांधणे ही कामे केली. जिल्हा परिषदेकडे ३७ वर्षे, ५ महिने व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पत्तन विभागाकडे १ वर्ष, ५ महिने अशी ३८ वर्षे, १० महिने अशी प्रदीर्घ शासकीय सेवा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.