डिसेंबर पूर्वी बहुतांश कामे होतील पूर्ण

डिसेंबर पूर्वी बहुतांश कामे होतील पूर्ण
Published on

डिसेंबरपूर्वी बहुतांश कामे होतील पूर्ण
राष्ट्रीय महामार्ग विभाग ; नीलेश राणेंनी घेतला कामाचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून कामाला गती देण्याबरोबरच अन्य कामेही लवकरच पूर्ण गेली पाहिजेत, अशी कल्पना ठेकेदाराला स्पष्ट भाषेत द्या अशी सूचना आमदार निलेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी (ता. २९) चिपळूण येथे आमदार नीलेश राणे यांनी महामार्गाच्या कामाची माहिती घेतली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपरीकरण व्हावे, यासाठी नीलेश राणे यांनी खासदारकीच्या कालखंडात केंद्र शासनाकडे मागणी केली होती. त्यांनी तसा पाठपुरावाही केला होता. गेल्यावर्षी रत्नागिरी-सिंधदुर्गचे खासदार म्हणून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडून आल्यानंतर त्यांनीही या प्रश्नात जातीने लक्ष दिले होते. या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. चिपळूण बहादूरशेखनाका येथे सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला होता. तसेच परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली, घाटात रस्ता खचला. पावसाळ्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. चिपळूण शहरात ओव्हर ब्रीजचे काम सुरू असताना कामगार जमिनीवर कोसळून जखमी झाले होते. तसेच शहरातही काही समस्या उद्भवत आहेत. या अनुषंगाने माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आमदार निलेश राणे यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
यावर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला व श्री. खुणेकर यांनी डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. बैठकीवेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, सुधीर पानकर, अभिषेक जागुष्टे, हरिश्चंद्र रहाटे, शौर्य निमकर आदी उपस्थित होते.
----
ओव्हरब्रीजचे काम त्वरित करा
आमदार राणे यांनी चिपळूणमध्ये राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये चिपळूण शहरातील ओव्हर ब्रिजचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या संदर्भात ठेकेदाराला समज देऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com