उन्हाळी हंगामासाठी आता ‘कोरे’तर्फे जादा रेल्वे गाडी

उन्हाळी हंगामासाठी आता
‘कोरे’तर्फे जादा रेल्वे गाडी
Published on

उन्हाळी हंगामासाठी आता
‘कोरे’तर्फे जादा रेल्वे गाडी

कणकवली,ता. ३० ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (एलटीटी) आणि मडगाव जंक्शन अशी साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे.
यापुर्वी जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ही जादा रेल्वे सोडली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (एलटीटी) साप्ताहिक विशेष ६ एप्रिल ते ४ मे पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते मडगाव जंक्शन मार्गावर साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (एलटीटी) येथून ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल. या गाडीचे आरक्षण २ एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात नमुद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com