बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी

बागायतदारांना तातडीने
नुकसान भरपाई द्यावी
Published on

55464

बागायतदारांना तातडीने
नुकसान भरपाई द्यावी

देवगडमध्ये ठाकरे शिवसेनेचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ : तालुक्याच्या किनारी भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची ठाकरे गट शिवसेना पक्षाची मागणी आहे. आपल्या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आले. अवकाळी पावसाने झालेल्या संभाव्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येथील ठाकरे गट शिवसेना पक्षाच्यावतीने तहसीलदार पवार यांची भेट घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, माजी सभापती रेश्मा सावंत यांच्यासह अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पंचयादी घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com