

rat४p११.jpg-
२५N५५४४३
रत्नागिरी ः मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलचे शिक्षक संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
---
सुविचारांचे आगळेवेगळे ‘संस्कारविश्व’
प्रज्ञा दळी ः गार्डी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठांनीही आचरणात आणावेत असे सुविचार संस्कारविश्व पुस्तकातून वाचकांसमोर आले आहेत. हे सुविचारच उद्याचे नागरिक घडवतील, असे देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी सांगितले.
देसाई हायस्कूलचे उपक्रमशिल शिक्षक संतोष गार्डी यांच्या संस्कारविश्व या सुविचारांच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या मातोश्री सुनंदा गार्डी यांच्या हस्ते झाले. संस्कारविश्व या पुस्तकात सुमारे साडेतीनशेहून अधिक सुविचार आहेत. या सुविचारांचा संग्रह त्यांनी तयार केला आहे. या सोहळ्याला माजी मुख्याध्यापक अशोक पाखरे, प्राचार्या राजश्री देशपांडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, सुनंदा गार्डी, अनुराधा पाखरे, ज्योती गावंड, अनंत देवळेकर, पत्रकार दुर्गेश आखाडे, नरेश पांचाळ, लेखक संतोष गार्डी, मिथिला गार्डी आणि मुग्धा गार्डी उपस्थित होते. ---
कोट
नेहमी खरे बोलावे पासून सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असे सुविचार सतत आपल्या वाचनात येत असतात. त्याच्या पलिकडे जाऊन आजच्या काळाशी सुसंगत असे नव्या युगाचे नवे सुविचार या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.
संतोष गार्डी (शिक्षक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.