वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येईल

वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता येईल
Published on

वक्फमुळे गरजू, मागासवर्गींना थेट लाभ
जाकीर शेकासन ः विधेयकामुळे मालमत्तेचे व्यवस्थापन पारदर्शी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ४: वक्फ मालमत्तांचा योग्य वापर, व्यवस्थापनात पारदर्शकतेची कमतरता आणि काही ठिकाणी गैरप्रकारांमुळे गरीब मुस्लिमांना त्याचा फायदा मिळत नव्हता. वक्फ विधेयकामुळे वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शी आणि प्रभावी होणार आहे तसेच समाजातील गरीब, महिला आणि मागासवर्गीय मुस्लिमांना याचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केला.
विधेयक मंजूर झाल्यानंतर शेकासन म्हणाले, वक्फ बोर्डात आता शिया, सुन्नी, बोहरा, आगाखानी यांसारख्या वेगवेगळ्या मुस्लिम सांप्रदायांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय, महिलांना आणि मागासवर्गीय (पसमांदा) मुस्लिमांना बोर्डात स्थान मिळणार आहे. या विधेयकामुळे वक्फ मालमत्तांवरून होणारे वाद आता कोर्टात नेले जाऊ शकतील. यापूर्वी २०१३ च्या कायद्यात वक्फ बोर्डाच्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येत नव्हते, त्यासाठी ट्रिब्युनल होते; मात्र आता ही अडचण दूर झाली आहे. मालमत्तांचे ऑडिट आणि नोंदणी अनिवार्य झाल्याने गैरव्यवहार थांबतील आणि त्यातून मिळणारा पैसा समाजाच्या भल्यासाठी वापरला जाईल. विधेयकातील मुख्य तरतुदीमध्ये वक्फ बोर्डात किमान दोन महिलांचा समावेश अनिवार्य असेल, वेगवेगळ्या मुस्लिम संप्रदायांचे प्रतिनिधी बोर्डात असतील. ज्यामुळे कोणताही गट वंचित राहणार नाही, वक्फ मालमत्तांचे ऑडिट आणि केंद्रीय डाटाबेसमध्ये नोंदणी बंधनकारक असेल, वक्फ बोर्डाच्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येईल, गैरमुस्लिमांचा समावेश फक्त प्रशासकीय कामांसाठी असेल, धार्मिक बाबींमध्ये नाही, असे त्यांनी सांगितले.
या विधेयकामुळे वक्फ मालमत्तांचा गैरवापर थांबेल आणि त्यातून मिळणारा नफा समाजाच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. हा कायदा मुस्लिम समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी आहे. यामुळे पारदर्शकता येईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल. पारदर्शकता, समावेशकता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित हे विधेयक समाजाला एक नवी आशा देणारे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com